शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
4
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
5
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
6
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
7
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
8
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
9
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
10
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
11
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
12
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
13
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
14
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
15
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
16
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
17
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
18
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
19
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
20
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ करणार विचारांचा प्रसार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2017 01:31 IST

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विशेष गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे.

ठळक मुद्देदीक्षाभूमीवर होणार आंबेडकर गौरवग्रंथाचे वितरण : मागासवर्गीयांसाठीच्या माहिती पुस्तिकेचे लोकार्पण

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी जयंतीवर्षानिमित्त राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने विशेष गौरवग्रंथ प्रकाशित केला आहे. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर : द आर्किटेक्ट आॅफ इंडिया’ हा गौरवग्रंथ धम्मचक्र प्रवर्तनदिनानिमित्त दीक्षाभूमीवर येणाºया बांधवांना उपलब्ध व्हावा, यासाठी विद्यापीठाने विशेष पुढाकार घेतला आहे.शुक्रवारी सायंकाळी ६.३० वाजता दीक्षाभूमी परिसरात केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते गौरवग्रंथ वितरण समारंभ तसेच वितरण केंद्राचे उद्घाटन होणार आहे. यावेळी महाराष्ट्र राज्याच्या अनुसूचित जाती आयोगाचे सदस्य न्या.सी.एल.थूल विशेष अतिथी राहतील. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्रभारी कुलगुरू डॉ. प्रमोद येवले भूषवतील. राष्ट्रबांधणी तसेच राष्ट्रउभारणीत डॉ. आंबेडकरांच्या योगदानावर या गौरवग्रंथात प्रकाश टाकण्यात आला आहे. इंग्रजी, मराठी व हिंदीतील एकूण ४७ लेखांचा यात समावेश आहे.तर मागासवर्गीयांच्या उपयोगासाठी प्रकाशित केलेल्या विद्यापीठ मार्गदर्शिकेचे लोकार्पण व वितरण केंद्राचे उद्घाटन शनिवार ३० सप्टेंबर रोजी सकाळी १०.३० वाजता होणार आहे. कृषी महाविद्यालय वसतिगृहाजवळ केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री व राज्याचे सामाजिक न्यायमंत्री राजकुमार बडोले यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडेल. राज्याच्या सामाजिक न्याय विभागाचे आयुक्त मिलिंद शंभरकर तसेच विद्यापीठाचे कुलसचिव पूरणचंद्र मेश्राम हे यावेळी प्रामुख्याने उपस्थित राहतील. मागासवर्गीयांसाठी उपलब्ध असलेल्या सोईसुविधा, केंद्र व राज्य शासनाचे निर्णय, आरक्षण धोरण, विविध योजना यांची माहिती या पुस्तिकेत आहे.विद्यापीठ गेल्या १५ वर्षांपासून नियमितपणे अशा पद्धतीने माहिती पुस्तिका काढत आहे. या माहिती पुस्तिकेचे नि:शुल्क वितरण करण्यात येईल, अशी माहिती कुलसचिवांनी दिली.