शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

कोलंबिया विद्यापीठात निनादेल ‘बोल इंडिया जयभीम’ 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 2, 2019 22:19 IST

उपराजधानीचे लेखक व चित्रपट दिग्दर्शक सुबोध नागदेवे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बोले इंडिया जयभीम’ या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे आयोजित पहिल्या दलित फिल्म अ‍ॅन्ड कल्चरल फेस्टिव्हलमध्ये त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यासोबत नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाचे प्रदर्शनही या महोत्सवात होणार आहे.

ठळक मुद्देनागपूरचे नागदेवे यांचा सन्मान : अमेरिकेत पहिला दलित फिल्म फेस्टिव्हल

लोकमत न्यूज नेटवर्क       नागपूर : उपराजधानीचे लेखक व चित्रपट दिग्दर्शक सुबोध नागदेवे यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘बोले इंडिया जयभीम’ या चित्रपटाची आंतरराष्ट्रीय पातळीवर दखल घेण्यात आली आहे. अमेरिकेच्या न्यूयॉर्क येथे आयोजित पहिल्या दलित फिल्म अ‍ॅन्ड कल्चरल फेस्टिव्हलमध्ये त्यांचा हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. यासोबत नागराज मंजुळे यांच्या फॅन्ड्री या चित्रपटाचे प्रदर्शनही या महोत्सवात होणार आहे.यूएस आंबेडकराईट्स, डॉ. आंबेडकर इंटरनॅशनल मिशन यांच्यावतीने येत्या २३ आणि २४ फेब्रुवारी रोजी हा महोत्सव होणार आहे. याअंतर्गत भारतातून चित्रपट सादर करण्याचे आवाहन संस्थांतर्फे करण्यात आले होते. त्यात देशातून ४० निर्मात्यांनी चित्रपट सादर केले होते व त्यातून सात चित्रपटांची निवड करण्यात आली. यामध्ये बोले इंडिया जयभीम व फॅन्ड्रीसह नागराज यांचाच ‘पिस्तुल्या’ तसेच ‘मसान’, रजनीकांत यांचा ‘काला’ आणि इतर भाषेतील ‘पॅपिल्लो बुद्धा, पेरियेरम पेरुमल’ या चित्रपटांचा समोवश आहे. २३ रोजी कोलंबिया विद्यापीठ आणि २४ रोजी दि न्यू स्कूल, न्यूयॉर्क येथे या चित्रपटांचे स्क्रीनिंग होणार आहे. याशिवाय ‘बी.आर. आंबेडकर नाऊ अ‍ॅन्ड देन, काकूस, वूई हॅव नॉट कम हिअर टू डाय, गांधी : अनटचेबल्स अ‍ॅन्ड मी, दि बॅटल ऑफ भीमा कोरेगाव, दालन सिरीज : नेपाळ’ या माहितीपटांचेही (डॉक्युमेंटरीज) सादरीकरण यावेळी केले जाणार आहे. त्यानंतर प्रेक्षक व तज्ज्ञांच्या उपस्थितीत या चित्रपटांच्या दिग्दर्शकांच्या मुलाखती होणार आहेत. या महोत्सवासाठी दिग्दर्शक नागराज मंजुळे तसेच दिग्दर्शक पा. रंजित व अभिनेत्री निहारिका सिंह प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत.ब्ल्यू थंडर फिल्म प्रॉडक्शन आणि चंद्रपूरच्या गायत्री फिल्म प्रॉडक्शनची निर्मिती आणि सुबोध नागदेवे यांचे लेखन दिग्दर्शन असलेल्या ‘बोले इंडिया जयभीम' हा चित्रपट मागील वर्षी प्रदर्शित झाला आहे. पहिल्यांदा ‘जयभीम’ या अभिवादनाचे प्रवर्तक व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या आंदोलनातील सैनिक बाबू हरदास एल. एन. यांच्या आयुष्याची गाथा आणि चळवळीच्या क्रांतीचा इतिहास या चित्रपटातून साकारला आहे. राज्यभरात या चित्रपटाला गौरविण्यात आले असून, नागदेवे यांच्या कामाचेही कौतुक होत आहे.डॉ. बाबासाहेबांच्या चळवळीतील निष्ठावंत कार्यकर्ता बाबू हरिदास एल. एन. यांचे कार्य समाजासमोर आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न, या चित्रपटाच्या माध्यमातून केला आहे. आता ही निर्मिती आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहचेल याचा आनंद नक्कीच आहे. अमेरिकेला जाऊन हा चित्रपट आणि आंबेडकरी चळवळीबाबत भूमिका मांडण्याचा मी प्रयत्न करणार आहे.सुबोध नागदेवे,दिग्दर्शक, बोले इंडिया जयभीम.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkarडॉ. बाबासाहेब आंबेडकरcultureसांस्कृतिक