नागपूर : दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनाला पाठिंबा दर्शविण्यासाठी राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेच्या नागपूर जिल्हा शाखेने गुरुवारी दुपारी एकजूट आंदोलन केले. या आंदोलनात महाराष्ट्र राज्य जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाच्या चतुर्थश्रेणी कर्मचारी संघटनेचाही सहभाग होता. संविधान चौकात तसेच संघटनेच्या कार्यालयासमोर भोजनाच्या सुटीत नारेनिदर्शने करण्यात आली.
शेतकरी विरोधी कृषी कायदे रद्द व्हावेत, अशी आंदोलनातील प्रमुख मागणी होती. या मागणीसाठीच संयुक्त किसान मोर्चाकडून दिल्लीत आंदोलन सुरू आहे. मजुरांच्या विरोधातील कायदे रद्द करावेत, अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या. मागण्यांचे निवेदन निवासी जिल्हाधिकारी खजांची यांच्यामार्फत स्वीकारण्यात आले. ज्ञानेश्वर महल्ले, नाना कडबे, मंगला जाळेकर, राजेंद्र ठाकरे, पुरुषोत्तम मिलमिले, नाना समर्थ, वंदना परिहार, यशवंत कडू, प्रशांत राऊत आदींचा या शिष्टमंडळात समावेश होता. अशोक दगडे, नारायण समर्थ, यशवंत कडू, सुनील व्यवहारे, प्रल्हाद शेंडे, मंगला जाळेकर, वंदना परिहार, नाना कडबे, केशव शास्त्री, राजेंद्र ठाकरे, प्रशांत राऊत, स्नेहल खवले, गोपीचंद कातुरे, नितीन सोमकुंवर, संजय तायडे, संजय तांदुळकर, श्याम वांदिले, बुधाजी सुरकर, मनीष किरपाल, सुभाष सुरपाम आदी कर्मचारी यात सहभागी झाले होते.