शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याला प्रत्युत्तर द्यायला सैन्याला संपूर्ण मुभा; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कठोर पवित्रा
2
एक रुपयात विम्याची योजना अखेर गुंडाळली; राज्यामध्ये आता पूर्वीचीच पीक विमा योजना लागू करणार
3
पुण्यातील बी. जे. मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंग; मंत्रालयातून चक्रे फिरल्यावर घेतली दखल
4
नस कापली... नंतर गळा चिरून डॉक्टरची आत्महत्या; डॉ. वळसंगकरांनंतर १२ दिवसांत दुसरी घटना
5
हवाई सीमेवर बंदी पाकच्याच मुळावर; पाकिस्तानच उत्पन्न स्रोत बंद होणार
6
अतिरेक्यांविरोधात स्पायवेअर वापरात चूक काय? पेगॅससप्रकरणी सुप्रीम कोर्टाने केला सवाल
7
शुभ मुहूर्तावर सोनेखरेदीसाठी बाजार सज्ज; अमेरिकन टॅरिफमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत चढ-उतार
8
फिअरलेस ‘वैभव’; ‘एक बिहारी सौ पर भारी!’ म्हणत १४ वर्षांच्या वैभव सूर्यवंशीचं शतकी यश
9
‘सोन्या’चे तात्पर्य?- बायका पुरुषांपेक्षा हुशारच!
10
ग्राहकांना योग्य किमतीत वीज मिळूच नये की काय?
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
ड्रग्जमाफियांनी पोखरली मुंबई विमानतळाची सुरक्षा; ड्रग्जचे पार्सल करायचे क्लिअर : कस्टम अधीक्षकासह दोन पोलिसांना अटक
13
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
14
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
15
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
16
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
17
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
18
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
19
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
20
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी

नागपुरात प्रशासकीय यंत्रणेने जोपासली अनोखी संवेदनशीलता!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 18, 2020 00:45 IST

कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शहराच्या विविध भागात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. स्वत:च्या पगारातून यथाशक्ती निधी गोळा करून त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या ७०० किट खरेदी करून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित केल्या.

ठळक मुद्देजीवनावश्यक वस्तूंच्या किटचे सातशे कुटुंबांना वाटप

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : कोरोनामुळे ‘लॉकडाऊन’च्या संकटकाळातही विविध विभागातील अधिकाऱ्यांनी सामाजिक बांधिलकीची जाण ठेवत शहराच्या विविध भागात राहणाऱ्या गरजू कुटुंबांना मदतीचा हात दिला आहे. स्वत:च्या पगारातून यथाशक्ती निधी गोळा करून त्यातून जीवनावश्यक वस्तूंच्या ७०० किट खरेदी करून स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून वितरित केल्या.शासकीय सेवेत असतानाही सामाजिक संवेदना असलेल्या अधिकाऱ्यांनी कोरोनामुळे निर्माण झालेल्या बिकट परिस्थितीत मदतीचा हात देऊन आपली संवेदशीलता जपली आहे. त्यात विभागीय आयुक्त कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी तसेच समाजकल्याण, विक्रीकर आदींचाही समावेश आहे.‘लॉकडाऊन’च्या संकटकाळात प्रशासकीय कामाची चौकट ओलांडून समाजातील दुर्लक्षित, कष्टकऱ्यांना सुखाचे चार घास मिळावे यासाठी अनेकजण पुढे आले आहेत. समाजातील शेवटच्या घटकातील एकही माणूस उपाशीपोटी झोपता कामा नये यासाठी प्रशासन युद्ध पातळीवर सर्वतोपरी प्रयत्न करीत असून याला स्वयंसेवी संस्थांकडून चांगला सहयोग मिळत आहे. या संकटकाळात विभागीय आयुक्त डॉ. संजीव कुमार यांनी मदतीचे एक पाऊल पुढे टाकले आहे. यासाठी त्यांनी अधिकाऱ्यांना साद घातली. त्याला प्रतिसाद देत महसूल उपायुक्त सुधाकर तेलंग, तहसीलदार प्रताप वाघमारे तसेच नितीन गोहणे, स्नेहल खवले यांनी सहकारी अधिकाऱ्यांना आवाहन केले. त्यांच्या या आवाहनाला महसूल नव्हे तर इतर विभागाच्या अधिकाऱ्यांनीही चांगला प्रतिसाद दिला. गोळा झालेल्या निधीमधून शासनातर्फे स्वस्त धान्य उपलब्ध होत असताना गरज राहते ती किराणा सामानाची. ती पूर्ण करण्यासाठी तीन डाळी, तेल, तिखट, मीठ, हळद आदी एक ते दीड महिना पुरेल एवढे साहित्य असलेल्या किट ७०० कुटुंबांसाठी तयार करण्यात आल्या. तिचे प्रियदर्शिनी संघटना, समता संघटना, कराडे मित्रमंडळ, सिद्धार्थ मित्रमंडळ आदींच्या साहाय्याने थेट गरीब व गरजूपर्यंत त्या वाटण्यात आल्या. हा उपक्रम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीदिनी करण्यात आला, हे विशेष.महसूल, विक्रीकर, समाजकल्याण, शिक्षण, माहिती आदी विभागातील अधिकाऱ्यांनी स्वत:च्या पगारातून तीन लाख रुपये गोळा केले. मोलमजुरी करणाऱ्या अत्यंत गरीब कुटुंबाची यादी तयार करण्यात आली. यामध्ये ओंकारनगर, वंजारीनगर, रामटेकेनगर, बेसा आदी भागात राहणाऱ्या गरीब कुटुंबांचा समावेश आहे.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर