शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

मनपा मुख्यालयाजवळ अस्वच्छता, अतिक्रमण : हायकोर्टाने दखल घेतली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 13, 2020 22:25 IST

सिव्हिल लाईन्स येथील महानगरपालिका मुख्यालयाजवळच्या परिसरातील अस्वच्छ नाला, अतिक्रमण व डुकरांचा हैदोस यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन, यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे.

ठळक मुद्दे जनहित याचिका दाखल केली

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : सिव्हिल लाईन्स येथील महानगरपालिका मुख्यालयाजवळच्या परिसरातील अस्वच्छ नाला, अतिक्रमण व डुकरांचा हैदोस यामुळे नागरिकांना होत असलेल्या त्रासाची मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने गंभीर दखल घेऊन, यासंदर्भात स्वत:च जनहित याचिका दाखल केली आहे. तसेच, या समस्या दूर करण्यासाठी दोन आठवड्यात आवश्यक कारवाई करण्याचा व त्यावर प्रतिज्ञापत्र सादर करण्याचा आदेश महानगरपालिकेला दिला आहे.या प्रकरणावर सोमवारी न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व अनिल किलोर यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकेचे कामकाज पाहण्याकरिता अ‍ॅड. निखिल पाध्ये यांची न्यायालय मित्र म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या समस्यांवर वर्तमानपत्रात बातमी प्रकाशित झाली होती. त्यावरून ही याचिका दाखल करण्यात आली. महानगरपालिका अस्वच्छता व अतिक्रमण हटविण्यासाठी शहरभर उपक्रम राबवते. परंतु, महानगरपालिका मुख्यालयाजवळ असलेल्या समस्यांकडे अधिकाऱ्यांनी दुर्लक्ष केले आहे. सिव्हिल लाईन्स येथील सेंट्रल टेलिग्राफ ऑफिसजवळून वाहणाऱ्या नाल्यामध्ये घाण पाणी व कचरा साचला आहे. हे ठिकाण मनपा मुख्यालयापासून केवळ १५० मीटर अंतरावर आहे. असे असताना मनपाचे त्याकडे दुर्लक्ष आहे. या नाल्यातील अस्वच्छतेमुळे आजूबाजूच्या परिसरात दुर्गंधी पसरली आहे. त्याचा नागरिकांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे. सायंकाळी व रात्री नागरिकांना घराबाहेर बसून वातावरणाचा आनंद घेता येत नाही. याशिवाय, मरियमनगर झोपडपट्टीतील लोकांच्या मालकीची डुकरे या परिसरात दिवसरात्र हैदोस घालतात. त्या व्यावसायिकांच्या भीतीपोटी कुणी मनपाकडे तक्रार करीत नाही. मनपाचे अधिकारी स्वत:हून कारवाई करीत नाही. मरियमनगरातील रस्त्यावर मोठ्या प्रमाणात अतिक्रमणही करण्यात आले आहे. त्याकडेदेखील मनपाने डोळेझाक केली आहे, असा आरोप संबंधित बातमीत करण्यात आला आहे. मनपातर्फे अ‍ॅड. सुधीर पुराणिक यांनी कामकाज पाहिले. या समस्या तातडीने दूर करण्यात येतील, अशी ग्वाही त्यांनी न्यायालयाला दिली.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयNagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिका