लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : लॉकडाऊननंतर बेरोजगार झालेल्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना अजनीतील फुलमती ले-आऊट येथे घडली. राजू अरुण कुवर (२५) असे मृत तरुणाचे नाव आहे. राजू वाहनचालकाचे काम करीत होता. तो मूळचा वर्धा येथील राहणारा आहे. त्याच्या आई-वडिलांचा मृत्यू झाला आहे. १५ वर्षांपूर्वी तो काका रमेश कुवर यांच्याकडे राहायला आला होता. लॉकडाऊनदरम्यान त्याची नोकरी गेली होती. तेव्हापासून तो प्रचंड मानसिक तणावात होता. काकाचे कुटुंबीयसुद्धा चिंतेत होते. परंतु तो आत्महत्या करेल अशी कुणाला कल्पनाही नव्हती.राजूने मंगळवारी रात्री १२.३० वाजता बेडशीटच्या मदतीने गळफास घेतला. कुटुंबीयांनी पोलिसांना सूचना दिली. पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला आहे.
नागपुरात बेरोजगार युवकाने लावला गळफास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2020 20:49 IST
लॉकडाऊननंतर बेरोजगार झालेल्या एका युवकाने गळफास लावून आत्महत्या केली. ही घटना अजनीतील फुलमती ले-आऊट येथे घडली.
नागपुरात बेरोजगार युवकाने लावला गळफास
ठळक मुद्दे तणावात होता युवक : लॉकडाऊनचा परिणाम