शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबईसह २९ महापालिका निवडणुकांचं बिगुल वाजणार?; थोड्याच वेळात निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद
2
मेस्सी राष्ट्रवादीच्या नेत्याला भेटायला जाणार, ते शरद पवार नाहीत; दिल्लीत कंपन्यांनी एका 'हँडशेक'साठी मोजले १ कोटी...
3
श्रीमंत लोक प्रदूषण करतात, त्रास गरिबांना होतो; सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी कठोर शब्दात सुनावले
4
२०३० मध्ये निवृत्त होणाऱ्या खासगी कर्मचाऱ्यांना दरमहा किती पेन्शन मिळेल? तुम्हीही करू शकता गणित
5
मोठी बातमी! मुंबई-नाशिक महामार्गावरील खारेगाव भुयारी मार्ग ४ महिने वाहतुकीसाठी बंद
6
"रणवीर सिंग उथळ, मला आवडत नाही पण...", 'धुरंधर' पाहिल्यानंतर मराठी अभिनेत्याने मांडलं परखड मत
7
१८९ बोगस कंपन्या, महागडी घड्याळं, आलिशान घर... कफ सिरप सिंडिकेटवर ED ची मोठी कारवाई
8
"भारत-पाकिस्तान यांच्यात दोन महिन्यात युद्ध...!" प्रकाश आंबेडकर यांची मोठी भविष्यवाणी 
9
Kolhapur: इचलकरंजीत मुख्यमंत्र्यांच्या हस्ते छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण
10
Vastu Shastra: वास्तूशास्त्रानुसार विंड चाइम धातूचे आणावे की लाकडी? ते किती रॉडचे असणे शुभ?
11
महिलांसाठी LIC ची 'सुपरहिट' योजना! फक्त ट्रेनिंग घ्या आणि दरमहा ७,००० रुपये मिळवा; घरबसल्या आहे काम
12
अमेरिकेत अहमदाबादसारखा अपघात होता होता राहिला! २७५ प्रवाशांना नेणाऱ्या विमानाचे टेक-ऑफच्या वेळी इंजिन बंद पडले...
13
नव्या Tata Sierra च्या टॉप मॉडेलची Price किती? कंपनीची मोठी घोषणा, एका क्लिकवर जाणून घ्या सर्व व्हेरिअंटच्या किंमती
14
Vastu Tips: २०२५ संपण्याआधी घरात आणा 'या' ५ शुभ वस्तू, ज्या करतील २०२६ मध्ये भाग्योदय
15
'धुरंधर'मधील या भूमिकेसाठी सुनील ग्रोव्हरला होती पहिली पसंती, पण.., नंतर या कॉमेडियनची झाली एन्ट्री
16
Sydney Shooting: पाकिस्तानातून ऑस्ट्रेलियात कसे पोहोचले सिडनी बीचवर गोळीबार करणारे सैतान? दहशतवादी 'पिता-पुत्रां'संदर्भात अनेक दावे
17
राजस्थानात स्टिंग ऑपरेशनं सत्ताधारी अन् विरोधकांमध्ये खळबळ; आमदारांच्या पायाखालची जमीन सरकली
18
जिओने वर्ष संपण्याआधीच धमाका केला, आणले तीन स्वस्त रिचार्ज प्लॅन; यात मिळतेय सर्वच...
19
सुपरहिरो! "मी मरणार आहे, कुटुंबाला सांगा...", गन हिसकावली, दहशतवाद्यांशी भिडला अहमद
Daily Top 2Weekly Top 5

नोकरीचे आमिष दाखवून बेरोजगारांची फसवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2019 01:01 IST

ठिकठिकाणच्या बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची लाखोंची रक्कम हडपणाऱ्या तरुणीला नंदनवन पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देठिकठिकाणच्या बेरोजगारांना लाखोंचा गंडा : सूत्रधार तरुणी गजाआड, अन्य आरोपींचा शोध सुरू

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ठिकठिकाणच्या बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून त्यांची लाखोंची रक्कम हडपणाऱ्या तरुणीला नंदनवन पोलिसांनी अटक केली. दीप्ती विश्वेश्वर खंडाते (वय २४) असे आरोपी तरुणीचे नाव आहे. या फसवणूक प्रकरणात तिच्यासोबत आणखी काही जणांचा समावेश असल्याचे प्राथमिक चौकशीत पुढे आले असून, पोलीस त्यांचाही शोध घेत आहेत.दीप्ती नंदनवन झोपडपट्टीच्या गल्ली नंबर ५ मध्ये राहते. ती आयटीआय झालेली असून, चांगली वाक्पटू आहे. रोजगाराच्या शोधात अनेकांकडे पायपीट करताना केवळ थापेबाजी पदरी पडत असल्याने दीप्तीने स्वत:च दुसऱ्या बेरोजगारांना नोकरीचे आमिष दाखवून फसवणुकीचा गोरखधंदा अवलंबिला. रेल्वे आणि शासनाच्या विविध विभागात नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून ती बेरोजगारांवर जाळे टाकत होती. प्रारंभी कागदपत्रे ताब्यात घ्यायची नंतर त्यांच्याकडून नियुक्तीच्या प्रक्रियेसाठी जुजबी रक्कम मागायची आणि त्यांची आर्थिक स्थिती लक्षात आल्यानंतर साहेबांना पैसे द्यावे लागते, असे सांगून त्यांच्याकडून रक्कम उकळायची. तिने विश्वासात घेतलेल्या काही तरुण-तरुणीच्या माध्यमातून गोंदिया येथील दत्तनगरात राहणारा चैतन्य दुलीचंद आंबेडायरे हा तरुण तिच्या जाळ्यात अडकला. त्याला रेल्वेत टीसीची नोकरी लावून देण्याचे आमिष दाखवून तिने त्याची शैक्षणिक कागदपत्रे ताब्यात घेतली. त्यानंतर १७ जानेवारी २०१९ ला चैतन्यकडून चेक तसेच रोखीच्या स्वरूपात दीप्तीने ३ लाख रुपये घेतले. १० मार्चला त्याला नियुक्तीपत्र मिळेल असे दीप्तीने सांगितले होते. मात्र, मार्च आणि एप्रिल महिना जात असून देखील चैतन्यला नियुक्ती मिळाली नसल्याने त्याने तिच्यामागे तगादा लावला. प्रत्येक वेळी वेगवेगळे कारण सांगणाऱ्या दीप्तीने नंतर त्याला टाळणे सुरू केले. त्यामुळे चैतन्यने आपली रक्कम तिला परत मागितली. ही रक्कम राजेश सर आणि भीमा नावाच्या आरोपीकडे दिल्याचे सांगून दीप्तीने स्वत:ची सुटका करून घेण्याचा प्रयत्न केला. दरम्यान, चैतन्य तिच्याकडे पैसे मागायला येत असताना त्याला त्याच्यासारखेच अनेक जण तिच्याकडे चकरा मारताना दिसले. तिने आपलीच नव्हे तर अनेकांची फसवणूक केल्याचे लक्षात आल्यानंतर या सर्वांनी गुरुवारी रात्री नंदनवन पोलिसांकडे धाव घेतली. पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल करून दीप्तीला अटक केली.

टॅग्स :fraudधोकेबाजीArrestअटक