शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरातील  आव्हाने समजून घेऊन ती सोडवणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2018 15:30 IST

शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, सोबतच पायाभूत विकासही व्हायला हवा. दोन्ही गोष्टीला पहिली प्राथमिकता राहील. अगोदर शहरातील समस्या व त्यासमोरील आव्हाने समजून घेईल, त्याचे अध्ययन करेल आणि त्यानंतरच त्या सोडविल्या जातील, असा विश्वास मनपाचे नवनियुक्त आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.

ठळक मुद्देवीरेंद्र सिंग : मनपा आयुक्तपदाचा पदभार स्वीकारला

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शहरातील नागरिकांना मूलभूत सुविधा मिळाव्यात, सोबतच पायाभूत विकासही व्हायला हवा. दोन्ही गोष्टीला पहिली प्राथमिकता राहील. अगोदर शहरातील समस्या व त्यासमोरील आव्हाने समजून घेईल, त्याचे अध्ययन करेल आणि त्यानंतरच त्या सोडविल्या जातील, असा विश्वास मनपाचे नवनियुक्त आयुक्त वीरेंद्र सिंग यांनी पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.वीरेंद्र सिंग यांनी शुक्रवारी जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याकडून मनपा आयुक्ताचा पदभार स्वीकारला. त्यानंतर त्यांनी मनपा प्रमुखांची बैठक घेतली. त्यांना शहरातील समस्या व आव्हाने कोणकोणती आहेत याची माहिती द्यावी, असे निर्देश दिले. यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मनपा आयुक्त वीरेंद्र सिंग म्हणाले, विभाग प्रमुखांकडून शहरातील समस्या व त्या सोडविण्यासाठी असलेली आव्हाने याबाबतची माहिती मागविली आहे. त्याचा अभ्यास करून त्या सोडविण्याची रुपरेषा ठरविली जाईल. आज पहिलाच दिवस आहे. मनपातील परिस्थिती समजून घेतल्यानंतरच पुढे काय करायचे ते ठरवू. बेस्ट देण्याचा प्रयत्न करू, इतके मात्र निश्चित. अधिकारी, पदाधिकारी, नगरसेवक आणि सामान्य जनतेमध्ये चांगला समन्वय स्थापित करण्याचा आपला प्रयत्न राहील, असेही त्यांनी सांगितले. यामुळे समस्या सोडविण्यात सोपे जाईल.नागरिकांचे भले करता येईल. नागपूर शहराला आणखी चांगले करण्याचा प्रयत्न करू. त्यांच्यानुसार बिल्डिंग परमिशन मॅनेजमेंट सिस्टीम राज्यातील २४० नगरपालिकांमध्ये अमलात आणण्यात आली आहे. ती टप्प्याटप्प्याने महापालिकेतही लागू करण्यात येईल.मनपा आयुक्तांचा पदभार स्वीकारण्यापूर्वी वीरेंद्र सिंग हे नगरपालिका प्रशासन मुंबई येथे संचालक व आयुक्त पदावर कार्यरत होते. २००६ च्या बॅचचे आयएएस अधिकारी असलेले सिंग यांनी जळगाव येथे सहायक जिल्हाधिकारी म्हणून सुरुवात केली. यानंतर जिल्हा परिषद बीड आणि सोलापूरचे सीईओ राहिले. सिंधुदुर्ग आणि औरंगाबाद येथे जिल्हाधिकारी म्हणूनही कार्य केले.फाईल लटकवून ठेवण्याची प्रवृत्ती संपवूसिंग यांनी सांगितले की, फाईल लटकवून ठेवण्याची प्रवृत्ती सोडायला हवी. कोणत्याही कामाचा रिझल्ट फास्ट असावा. आता ‘वेब बेस्ड सिस्टीम’ येत आहे. मनपातही अशी प्रणाली अमलात आणली जाईल. आयटीटी माहिती असल्याने त्याचा उपयोग करून कार्यप्रणाली अधिक सहज करण्याचा प्रयत्न करू, असेही त्यांनी सांगितले.मुख्यमंत्री-गडकरींचा दबाव नाहीमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे नागपूर शहरातील असल्याने काही मानसिक दबाब आहे का, अशी विचारणा काही पत्रकारांनी केली असता ते म्हणाले, त्यांच्या मार्गदर्शनात काम करणे हे माझे ‘लक’ आहे. दबावाचा प्रश्नच निर्माण होत नाही. माझ्यापूर्वी येथे जे आयुक्त राहिले आहेत त्यांनी माझ्यापेक्षाही चांगले काम केले आहे. मी सुद्धा चांगले काम करण्याचा प्रयत्न करेल.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाcommissionerआयुक्त