शहरं
Join us  
Trending Stories
1
जातनिहाय जनगणनेचे स्वागत, पण कधी पूर्ण करणार ते सांगा; राहुल गांधी यांनी केंद्र सरकारच्या निर्णयाला दिला पाठिंबा
2
दहशतवाद्याने विचारले, आप काश्मिरी हो क्या? जालन्यातील युवकाचा दावा : रेखाचित्र पाहताच ‘एनआयए’ला ई-मेल
3
यावेळी तीन तुकडेच करा! पीएम मोदींनी काल पाच उच्चस्तरीय बैठका घेतल्या
4
आजचे राशीभविष्य, १ मे २०२५: व्यापारात फायदा अन् नोकरीत बढतीची शक्यता
5
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आता वर्षा बंगल्यामध्ये; अक्षय्य तृतीयेचा मुहूर्त साधून केली विधीवत पूजा
6
ग्रामीण भागात रोजगार वाढले; तरुणांपुढे आव्हाने, तरुणांपुढे गुणवत्तापूर्ण उपजीविकेशी संबंधित आव्हाने कायम
7
एफआयआर नोंदविण्यास नकार हे दुर्दैव; अक्षय शिंदे एन्काऊंटरप्रकरणात क्राइम ब्रँचच्या ‘एसआयटी’वर उच्च न्यायालयाची नाराजी
8
एमएमआरटीएकडून बेस्ट भाडेवाढ मंजूर; अधिकृत घोषणेची प्रतीक्षा
9
रेल्वेच्या बैठकीला पाच खासदारांची दांडी; प्रवाशांना चांगल्या सुविधा पुरविण्याचे आश्वासन
10
पुढील जनगणनेची तारीख लवकरच जाहीर; काेराेनामुळे झाला नव्हता निर्णय
11
भारतासोबतच्या टॅरिफ वाटाघाटी प्रगतिपथावर; अमेरिकी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे प्रतिपादन
12
CSK प्लेऑफ्सच्या शर्यतीतून आउट; IPL च्या इतिहासात धोनीच्या संघावर पहिल्यांदाच आली ही वेळ
13
पाकिस्तान हादरला !! बसले भूकंपाचे तीव्र धक्के; किती होती तीव्रता? काय आहे सध्याची परिस्थिती?
14
जातिनिहाय जनगणना निर्णयावरुन आता श्रेयवादाची लढाई; भाजपा नेत्यांचा राहुल गांधींवर पलटवार
15
चहलनं साधला मोठा डाव; IPL मधील दुसऱ्या हॅटट्रिकसह युवराज सिंगच्या विक्रमाशी बरोबरी
16
"आम्ही सुरुवात करणार नाही, पण...!"; पाकिस्तानची भारताला पोकळ धमकी
17
"2043 पर्यंत या देशांमध्ये असेल मुस्लिमांचं राज्य", बाबा वेंगा यांची भविष्यवाणी!
18
दिशा सालियन प्रकरण: सतीश सालियन यांच्या याचिकेवर भूमिका स्पष्ट करा; HCचे सरकारला निर्देश
19
'सरकारला 'टेकू' असला की मनमानी करता येत नाही'; जातनिहाय जनगणनेच्या मुद्द्यावरून खोचक टोला
20
संध्याकाळचे पेट्रोलिंग टाळले म्हणून पोलिस आयुक्तांनी ठाण्यात पोहोचून ठाणेदारांना फटकारले!

नागपुरात स्पाच्या नावाआड हायप्रोफाईल सेक्स रॅकेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2018 20:41 IST

सदरमध्ये सलून-स्पाच्या नावाआड हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली.

ठळक मुद्देदोघांना अटक : तिघींची सुटका : गुन्हे शाखेची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सदरमध्ये सलून-स्पाच्या नावाआड हायप्रोफाईल सेक्स रॅकेट चालविणाऱ्या दोघांना गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाने अटक केली. अल्पावधीत मोठी रक्कम हाती पडत असल्याने वेश्याव्यवसाय करणाऱ्या तीन महिला-मुलींनाही पोलिसांनी ताब्यात घेतले होते. मात्र, चौकशी केल्यानंतर त्यांची सुटका करण्यात आलीराहुल मदनलाल गुप्ता (वय ३४, रा. एमआयटी ले-आऊट, उमरेड रोड)आणि अजय मुरलीधर शर्मा (वय ३२, रा. मानकापूर) अशी सेक्स रॅकेट चालविणारांची नावे आहेत. त्यांनी सदर पोलीस ठाण्याच्या हद्दीत महापालिकेच्या बाजूला हेवन सलून स्पा सुरू केले होते. महिला-मुलींकडून मसाज करवून घेण्याच्या नावाखाली ते येथे वेश्याव्यवसाय करवून घ्यायचे. मोठी रक्कम मोजणाऱ्या ग्राहकांना ते पाहिजे तेथे देहविक्रय करणाऱ्या महिला-मुली उपलब्ध करून द्यायचे. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकात कार्यरत पोलीस नायक संजय प्रभूदास पांडे यांना या रॅकेटची माहिती मिळाली. त्यांनी आपल्या वरिष्ठांना याबाबत माहिती कळवली. त्यानंतर शहानिशा करून घेण्यात आली. येथे कुंटणखाना चालत असल्याची खात्री पटल्यानंतर कारवाईसाठी सापळा रचण्यात आला. ठरल्याप्रमाणे सोमवारी सायंकाळी ५ च्या सुमारास पोलिसांनी पाठविलेले बनावट ग्राहक गुप्ता आणि शर्माच्या स्पा मध्ये पोहचले. त्यांनी देहविक्रय करणाऱ्या महिला-मुलींची मागणी करताच गुप्ता-शर्माच्या जोडगोळीने त्यांना वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिघी जणी उपलब्ध करून दिल्या. ठरल्याप्रमाणे काही वेळातच पोलीस पथक आतमध्ये धडकले. त्यांनी तीन वारांगनांसोबत गुप्ता-शर्माला ताब्यात घेतले.वारांगनांचे घूमजावपोलिसांनी पकडताच वेश्याव्यवसाय करणाऱ्या तिघींनीही घूमजाव केले. गुप्ता आणि शर्मा पैशाचे आमिष दाखवून देहविक्रय करण्यास भाग पाडत असल्याचे त्या म्हणाल्या. त्यांचे बयान नोंदवून पोलिसांनी त्यांना सोडून दिले. तर, गुप्ता आणि शर्माविरुद्ध सदर पोलीस ठाण्यात अनैतिक व्यापार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाnagpurनागपूर