शहरं
Join us  
Trending Stories
1
Baramati By Election 2026: “सुनेत्राकाकींना बिनविरोध निवडून देण्यासाठी सहकार्य करा”; रोहित पवारांचे काँग्रेसला आवाहन
2
होर्मुज सामुद्रधुनी उघडा, अन्यथा...; डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला शेवटचा इशारा, युद्धविराम धोक्यात?
3
फ्लॅटसाठी १ कोटी मोजले, मध्यरात्री बाल्कनीचे छत कोसळले...; व्हायरल व्हिडीओमुळे रिअल इस्टेट क्षेत्राचे पितळ उघडे पडले
4
मोठे गिफ्ट! आता कारच्या डॅशबोर्डवर दिसणार व्हॉट्सॲप; चॅटिंग, कॉलही करता येणार; Apple CarPlay साठी खास अ‍ॅप लाँच
5
"माझ्याकडे दैवी शक्ती आहे..." म्हणत लुटले १६ एकर रान; भोंदू अशोक खरातचा शेतकऱ्यांना गंडा, १४ वा गुन्हा दाखल
6
IPL 2026: मैदानात शुभमन गिलकडून झाली चूक, डगआऊटमध्ये आशिष नेहराचा चढला पारा, रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद
7
आजी म्हणायची कोरे कपडे घालू नका... पण का? जुन्या पिढीच्या 'त्या' भीतीला विज्ञानाचा आधार!
8
ट्रम्पना मोठा स्पर्धक तयार झाला! पाकिस्तान सीझफायरसाठी नोबेल मागू लागला; शरीफ, मुनीर...
9
Ashok Kharat : "तुला मुलगाच होईल..." असं सांगून भोंदू अशोक खरातने गर्भवतीवर केले होते अत्याचार
10
मस्साजोग सरपंचपदाची पोटनिवडणूक बिनविरोध होणार? संतोष देशमुखांच्या पत्नी उमेदवारी अर्ज भरणार
11
Viral Video: "नोकरी हवी तर किम जोंग उनला शिवी दे..."; कंपनीची अजब अट पाहून उमेदवार थरथरला
12
Top Marathi News LIVE Updates: काँग्रेसने आपला उमेदवार मागे घ्यावा; सुप्रिया सुळेंची काँग्रेसला विनंती
13
मस्करीची कुस्करी! मित्राच्या गुप्तांगात भरली एअर कॉम्प्रेसरने हवा; आतड्यांचा अक्षरशः गोळा झाला अन्...
14
इस्रायलच्या हल्ल्यांनं लेबनान हादरला, १० मिनिटांत १०० हून अधिक ठिकाणी हल्ले! २५४ जणांचा मृत्यू, अनेक जखमी; इराण म्हणाला...
15
पाकिस्तान खोटारडा निघाला...! सीजफायरच्या नावाखाली इराणचा गेम? की अमेरिकेनं मोडला करार...? लेबनानवरून नवा वाद
16
Kruthika Reddy : इंजेक्शन, गर्लफ्रेंड अन् डिजिटल पुरावे; डॉ. कृतिका रेड्डी हत्याप्रकरणात पतीच्या चॅटने फिरली चक्र
17
इराणनं विश्वासघात केला तर, सर्वनाश अटळ! ट्रम्प यांचा इशारा, होर्मुजजवळ अजूनही युद्धनौका तैनात
18
स्मृती मानधना आणि पलाश मुच्छल यांच्यातील दुरावा मिटला? कुटुंबातील सदस्यांचा एकत्रित फोटो व्हायरल
19
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
20
"पाकिस्तान विश्वासार्ह नाही!" इस्रायली राजदूताचा अमेरिकेला घरचा आहेर; जेडी व्हॅन्स यांच्या पाकिस्तान दौऱ्यापूर्वीच खळबळ
Daily Top 2Weekly Top 5

गोदरेज आनंदन टाऊनशिपमध्ये अस्वच्छता : हायकोर्टात याचिका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 24, 2020 22:40 IST

गणेशपेठ येथील गोदरेज आनंदन टाऊनशिपमधील अस्वच्छतेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने महानगरपालिका आयुक्त व गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.

ठळक मुद्देमनपा व गोल्डब्रिक्स कंपनीला नोटीस

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गणेशपेठ येथील गोदरेज आनंदन टाऊनशिपमधील अस्वच्छतेसंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाच्यानागपूर खंडपीठात याचिका दाखल करण्यात आली आहे. उच्च न्यायालयाने महानगरपालिका आयुक्त व गोल्डब्रिक्स इन्फ्रास्ट्रक्चर कंपनीला नोटीस बजावून यावर आठ आठवड्यांमध्ये उत्तर सादर करण्याचे निर्देश दिले आहेत.याचिकेवर न्यायमूर्तीद्वय रवी देशपांडे व पुष्पा गणेडीवाला यांच्यासमक्ष सुनावणी झाली. याचिकाकर्त्यांमध्ये सुनील चिरानिया व इतर पाच रहिवाशांचा समावेश आहे. सहा टॉवरच्या या गृह प्रकल्पामध्ये सध्या ३०० वर कुटुंबे राहत आहेत. योजनेतील अविकसित भागामध्ये रोजचे सांडपाणी व पावसाचे पाणी साचते. त्यामुळे डास व अन्य विषारी कीटकांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यांच्यापासून योजनेतील रहिवाशांना मलेरिया, डेंग्यू, मेंदूज्वर, कावीळ, चिकनगुनिया असे विविध गंभीर आजार होत आहेत. हे आजार लहान मुलांसाठी घातक ठरत आहेत. तसेच, परिसरात झाडेझुडपे वाढली आहेत व कचरा पसरला आहे. परिसराची देखभाल करण्याची व सर्वत्र स्वच्छता ठेवण्याची जबाबदारी गोल्डब्रिक्स कंपनीची आहे. रहिवाशांनी या समस्यांसंदर्भात कंपनीला वारंवार कळवले. परंतु, कंपनीने त्याकडे लक्ष दिले नाही. याविषयी १९ ऑगस्ट रोजी मनपाकडेही तक्रार करण्यात आली. मनपानेदेखील काहीच कारवाई केली नाही, असे याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे. योजनेतील रहिवाशांचे आरोग्य धोक्यात टाकणाऱ्या गोल्डब्रिक्स कंपनीवर कडक कारवाई करण्यात यावी अशी विनंती न्यायालयाला करण्यात आली आहे.

टॅग्स :High Courtउच्च न्यायालयnagpurनागपूर