शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ सामुद्रधुनी पुन्हा बंद! तेल जहाजांची वाहतूक थांबली, इस्रायलच्या हल्ल्यानंतर इराणचा दणका
2
DC vs GT : मिलरची एक चूक नडली! दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध गुजरात टायटन्सनं शेवटच्या चेंडूवर मारली बाजी
3
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
4
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
5
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
6
DC vs GT, David Miller retd hurt : विक्रमी धावसंख्येचा पाठलाग करताना किलर मिलरनं सोडलं मैदान; मग...
7
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
8
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
9
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
10
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
11
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
12
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
13
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
14
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
15
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
16
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
17
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
18
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
19
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
20
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात मामाने केली भाच्याची हत्या, हे होते कारण...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 10, 2021 11:55 IST

पत्नीचे अनैतिक संबंध असल्याच्या संशयातून उठलेल्या वादामुळे मामाने भाच्याची हत्या केली. ही घटना गड्डीगोदाम भागात शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास घडली.

ठळक मुद्देधमकीचा वचपा : मामा घेत होता पत्नीवर शंका

नागपूर : कौटुंबिक कलहातून मामाने आपल्या भाच्यालाच संपविल्याची घटना शुक्रवारी रात्री १२ वाजता गड्डीगोदाम मशीदजवळ घडली. अतुल प्रकाश उके (४२) असे मृत भाच्याचे नाव आहे, तर दिनेश भगवान लोखंडे (४९) असे आरोपी मामाचे नाव आहे. या खुनामुळे परिसरात वेगवेगळी चर्चा करण्यात येत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अतुल आरोपी दिनेशच्या मोठ्या बहिणीचा मुलगा आहे. दिनेशच्या पत्नीचे अतुलच्या घराला लागूनच माहेर आहे. दिनेश आपल्या पत्नीवर शंका घेत होता. त्यामुळे त्याचा पत्नीसोबत वाद सुरू आहे.

काही वर्षांपासून दिनेश आणि त्याची पत्नी वेगळे राहत आहेत. त्याची पत्नी मुलगा शुभम आणि मुलीसोबत अतुलच्या घराजवळ राहतात. दिनेशचा मुलगा आणि अतुल मित्र असल्याचे बोलले जाते. शुक्रवारी रात्री ८ वाजता दिनेशने पत्नीच्या घरी जाऊन वाद घातला. मुलगा घरी आल्यानंतर त्याच्या आईने दिनेशने घरी येऊन वाद घातल्याचे सांगितले. त्यामुळे दिनेशचा मुलगा शुभम आणि अतुलने दिनेशच्या घरी जाऊन शिवीगाळ केली. त्याला धमकी देऊन दरवाजावर लाथ मारून निघून गेले. दरम्यान, दिनेशला त्याच्या घराबाहेर अतुल आणि शुभमचे आणखी काही साथीदार असल्याची शंका आली. त्याने आतून दार उघडले नाही. त्यानंतर अतुल गड्डीगोदाम बोगद्याजवळ काही मित्रांसोबत दारू पिऊन मशीदजवळ येऊन थांबला.

दिनेशही अतुलला धडा शिकविण्याच्या तयारीत होता. दिनेशने रात्री १२ वाजता मशीदजवळ अतुलच्या डोक्यावर लोखंडी पाईप मारून त्याला जागीच ठार केले. घटनेची माहिती मिळताच सदरचे ठाणेदार विनोद चौधरी यांनी त्याची दुचाकी ताब्यात घेऊन बसस्टॅण्ड आणि रेल्वेस्टेशनवर कर्मचाऱ्यांना पाळत ठेवण्यास सांगितले. रात्री उशिरा दिनेश गड्डीगोदाममध्येच पोलिसांच्या हाती लागला.

आधीही गंभीर गुन्हे दाखल

आरोपी दिनेशवर खुनासह मारहाणीचे गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना दिनेश आपल्या पत्नीवर शंका असल्याची माहिती देत आहे. त्यासाठी पत्नीशी वाद झाल्यावर अतुल आणि त्याचा मुलगा त्याला मारहाण करीत होते. शुक्रवारी रात्रीही अतुल आणि त्याचे साथीदार दिनेशला धमकी देऊन गेले होते.

कडेकोट बंदोबस्तात केले न्यायालयात हजर

पोलिसांना खुनाच्या घटनेनंतर परिस्थिती चिघळण्याची शंका आहे. त्यामुळे पोलीस दक्षता बाळगत आहेत. त्यामुळे आरोपी दिनेशला कडेकोट बंदोबस्तात शनिवारी दुपारी न्यायालयात हजर करण्यात आले.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी