शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर राज्य खनिकर्म महामंडळाने काढल्या रेतीच्या अनधिकृत निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2018 21:40 IST

महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लि. (महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ) ने अनधिकृतपणे रेती घाटाचे टेंडर काढले आहे, असा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि सचिव अरुण वनकर यांनी बुधवारी संयुक्त पत्रपरिषदेत केला.

ठळक मुद्देप्रशांत पवार, अरुण वनकर यांचा आरोप : धंतोली पोलीस ठाण्यात तक्रार

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : महाराष्ट्र स्टेट मायनिंग कॉर्पोरेशन लि. (महाराष्ट्र राज्य खनिकर्म महामंडळ) ने अनधिकृतपणे रेती घाटाचे टेंडर काढले आहे, असा आरोप जय जवान जय किसान संघटनेचे अध्यक्ष प्रशांत पवार आणि सचिव अरुण वनकर यांनी बुधवारी संयुक्त पत्रपरिषदेत केला.पवार आणि वनकर यांनी सांगितले की, राज्य खनिकर्म महामंडळाने ६ नोव्हेंबर २०१८ रोजी एका वृत्तपत्रात दिलेल्या जाहिरातीद्वारे रेती घाटाचे टेंडर मागितले आहे. रेती खनन, परिवहन, साठवणूक, लोडिंग आदींबाबत नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोली आणि चंद्रपूर या जिल्ह्यातील रेती घाटासंबंधात हे टेंडर आहे. रेती घाटासंदर्भात संबंधित जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घेऊन यासंबंधात मायनिंग कॉर्पोरेशनला टेंडर काढण्याचे अधिकार आहेत. तसेच पर्यावरण विभागाचे ना हरकत प्रमाणपत्रही घ्यावे लागते. परंतु मायनिंग कॉर्पोरेशनचे प्रबंध संचालक एस. राममूर्ती यांनी अशी कोणतीही रीतसर परवानगी न घेता आणि मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगनादेश असताना हा स्थगनादेश काढला आहे. याशिवाय टेंडर भरणाऱ्या उद्योगपतींना प्रत्येकी ५० लाख रुपये भरण्याचेही जाहीर केले आहे. यामुळे अनेक टेंडर अग्रीम राशी भरणाऱ्या उद्योगपतींचीही फसवणूक झाली आहे.त्यामुळे त्यांच्याविरुद्ध ४२० नुसार गुन्हा दाखल करण्यात यावा, अशी तक्रार धंतोली पोलीस ठाण्यात केली असल्याचेही त्यांनी सांगितले. यासोबत न्यायालयात दाद मागण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

टॅग्स :sandवाळूPolice Stationपोलीस ठाणे