शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
3
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
4
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
5
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
6
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
7
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
8
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
9
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
10
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
11
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
12
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
13
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
14
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
15
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
16
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
17
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
18
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
19
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
20
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

उमरेडच्या संदीपची राष्ट्रीय दाैड स्पर्धेत बाजी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2021 04:10 IST

लोकमत न्यूज नेटवर्क उमरेड : घरची परिस्थिती बेताचीच. वडिलांचे छोटेसे किराणा दुकान. असंख्य काैटुंबिक अडथळे असले तरीही आपल्याला राष्ट्रीय ...

लोकमत न्यूज नेटवर्क

उमरेड : घरची परिस्थिती बेताचीच. वडिलांचे छोटेसे किराणा दुकान. असंख्य काैटुंबिक अडथळे असले तरीही आपल्याला राष्ट्रीय पातळीवरील ‘अडथळ्यांची दौड’ जिद्दीने आणि परिश्रमाने पार करायचीच आहे, असा चंग त्याने बांधला. सतत तीन वर्षे घाम गाळला आणि ज्युनिअर राष्ट्रीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत चक्क रौप्य पदक खेचून आणले.

उमरेड येथील संदीप विनोद गोंड असे या १५ वर्षीय खेळाडूचे नाव असून, १६ वर्षाआतील मुलांच्या ८० मीटर हर्डल्स शर्यतीमध्ये (अडथळा दौड) त्याने ही कामगिरी केली आहे. या स्पर्धा ६ ते १० फेब्रुवारीदरम्यान गुवाहाटी येथे पार पडल्या. मूळचा उमरेड येथील संदीप नागपूरच्या भारतीय कृषी विद्यालयात इयत्ता दहावीत शिक्षण घेत आहे. मागील वर्षापासून क्रीडा प्रबोधिनीच्या निवासी वसतिगृहात त्याची निवड झाली. तत्पूर्वी संदीपने उमरेड येथे ओम साई स्पाेर्टिंग क्लबच्या माध्यमातून संपूर्ण प्रशिक्षण घेतले. पहाटे अडीच तास तर सायंकाळी दोन तास घाम गाळत त्याने मेहनतीच्या बळावर हे यश गाठले. त्याच्या यशात ओम साई स्पाेर्टिंग क्लबचे रितेश राऊत, पवन मडावी, मंगेश ठवरे, प्रफुल्ल बेले, गजानन ठाकरे, सौरभ राऊत, आकाश बनकर आदींचा सहभाग असल्याचे तो आवर्जून सांगतो. अजून राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवरील स्पर्धेचा बराच पल्ला गाठायचा असल्याच्या प्रतिक्रिया संदीपने व्यक्त केल्या.