शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

कांबळे दुहेरी हत्याकांड प्रकरणात उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 21, 2018 23:12 IST

अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असलेल्या कांबळे दुहेरी हत्यांकाड प्रकरणी न्यायालयात फौजदारी खटला चालविण्यासाठी शासनाने अ‍ॅड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाच्या विधी व न्याय विभागाने अ‍ॅड. निकम यांच्या नियुक्तीचे आदेश शनिवारी जारी केले.

ठळक मुद्देमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रयत्नांना यश

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : अत्यंत गंभीर आणि संवेदनशील असलेल्या कांबळे दुहेरी हत्यांकाड प्रकरणी न्यायालयात फौजदारी खटला चालविण्यासाठी शासनाने अ‍ॅड. उज्वल निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली आहे. शासनाच्या विधी व न्याय विभागाने अ‍ॅड. निकम यांच्या नियुक्तीचे आदेश शनिवारी जारी केले.या हत्याकांडानंतर पत्रकार रविकांत कांबळे हे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटले होते. त्यावेळी त्यांनी हे प्रकरण न्यायालयात चालविण्यासाठी अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. यावेळी त्यांच्यासोबत पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे हेही होते. मुख्यमंत्री यांनी  रविकांत कांबळे यांना त्यावेळी अ‍ॅड. निकम यांच्यामार्फत हा खटला लढण्यासाठी त्यांची नियुक्ती केली जाईल, असे आश्वासन दिले होते. त्यानुसार शासनाने आपले आश्वासन पाळले आहे.अ‍ॅड. निकम यांची या खटल्यासाठी नियुक्ती करण्याची मागणी लक्षात घेता पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनीही शासनाकडे त्यासाठी प्रयत्न केले. त्या प्रयत्नांना यश आले. आहे. गेल्या १७ फेब्रुवारी रोजी पत्रकार रविकांत कांबळे यांची आई उषा सेवकदास कांबळे आणि दीड वर्षाची मुलगी राशी या दोघांची गळा चिरून हत्या करण्यात आली होती. या घटनेमुळे संपूर्ण नागपूर शहर ढवळून निघाले होते. या दोघींचा मृतदेह आरोपींनी एका पोत्यात कोंबून कारने विहीरगावकडे जाणाऱ्या नाल्यात टाकला होता.ही घटना हुडकेश्वर पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली होती. या दरम्यान पोलिसांनीही २४ तासात तपास लावून आरोपींना ताब्यात घेतले होते. या घटनेचे गांभीर्य व संवेदनशीलता लक्षात घेता नागपूर शहर सहपोलीस आयुक्त शिवाजी बोडखे यांनी या प्रकरणात विशेष शासकीय अभियोक्ता म्हणून अ‍ॅड. उज्वल निकम यांची नियुक्ती करावी असा अहवाल २० एप्रिल रोजी शासनाकडे पाठविला होता. या अहवालाची व फिर्यादीच्या मागणीची शासनाने लगेच दखल घेत अ‍ॅड. निकम यांची विशेष सरकारी वकील म्हणून नियुक्ती केली.

टॅग्स :Ujjwal Nikamउज्ज्वल निकमCourtन्यायालय