शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026 : राजस्थान रॉयल्सचा 'वैभवशाली' विजय; 'ध्रुवतारा'ही चमकला! रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा पहिला पराभव
2
Video: दांड्याने मारले, कपडे फाडले; खाली ओढून लाथांनी तुडवले; ठाण्यात बसचालकाला अमानुष मारहाण
3
वैभव सूर्यवंशीचा आणखी एक धमाका! भुवी-जोश हेजलवूडची धुलाई; फक्त १५ चेंडूत ठोकली फिफ्टी
4
नारायण राणे म्हणजे शून्यातून विश्व निर्माण करणारे नेतृत्व; मुख्यमंत्री फडणवीसांकडून कार्याचा गौरव
5
Tiger Attack Gondia: घराबाहेर खेळत असतानाच वाघाने घातली झडप, सहा वर्षांचा प्रज्वल ठार
6
खामेनेईच्या हत्येनंतर इराण बनला आणखी धोकादायक, अमेरिका-इस्रायलचे IDF च्या रिपोर्टने वाढवले टेन्शन
7
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
8
Virat Kohli Clean Bowled : बिश्नोईचा जादूई चेंडू...२०० च्या स्ट्राईक रेटनं धावा काढणारा कोहली फसला
9
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
10
‘धुरंधर’ अभिनेता रणवीर सिंगने संघ मुख्यालयात घेतली सरसंघचालक मोहन भागवत यांची भेट
11
"अमेरिकेची जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
12
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
13
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
14
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
15
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
16
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
17
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
18
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
19
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
20
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
Daily Top 2Weekly Top 5

गुरुद्वारातील दानपेटी फोडणारे दोघे अटकेत, दोन फरार

By दयानंद पाईकराव | Updated: May 20, 2024 20:31 IST

२० हजार रुपये केले जप्त : कळमना पोलिसांची कारवाई

नागपूर: मिनिमातानगरातील गुरुद्वारामधील दानपेटी फोडून एक ते दीड लाख रुपये चोरून नेणाऱ्या आरोपीपेकी दोघांना कळमना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून या चोरीतील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत. दरम्यान अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून पोलिसांनी २० हजार ५६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.

हिमांशु प्रविण यादव (२२, रा. नालंदानगर, भगवाननगर अजनी) आणि सुजल राजु गिरी (२०, रा. न्यु केलासनगर मानेवाडा रोड अजनी) अशी अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत. बुधवारी १५ मे रोजी रात्री २.३० वाजताच्या दरम्यान आरोपींनी कळमना पोलिस ठाण्याच्या हद्दीत मिनिमातानगर येथील गुरु घासीदास सतनामी समाज, मानव उत्थान ट्रस्ट येथील गुरुद्वाराच्या लोखंडी दाराचे कुलुप तोडून आत प्रवेश केला होता. चोरटयांनी दानपेटीचे कुलुप तोडून त्यातील अंदाजे एक ते दीड लाख रुपये चोरून नेले होते. या प्रकरणी नरेंद्र हिरालाल बघेल (४४, रा. मिनिमातानगर) यांनी दिलेल्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध कलम ४५७, ३८० नुसार गुन्हा दाखल केला होता. या गुन्ह्याच्या तपासात कळमना ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुल महाजन आणि अंमलदारांना मिळालेल्या खात्रीशीर माहितीवरून त्यांनी आरोपी हिमांशु आणि सुजलला ताब्यात घेऊन चौकशी केली असता त्यांनी दानपेटी फोडून रक्कम चोरी केल्याची कबुली दिली. आरोपींच्या ताब्यातून १, २ व ५ रुपयांची नाणे व नोटा असा २० हजार ५६६ रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलिस निरीक्षक गोकुळ महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलिस निरीक्षक उज्वल इंगोले, उपनिरीक्षक संतोष रामलोड यांनी केली.दोन आरोपी अद्यापही फरारदानपेटी फोडून रक्कम चोरी करणारे हिमांशु आणि सुजलला अटक करून पोलिसांनी त्यांची चौकशी केली. चौकशीत आरोपींनी आपल्यासोबत आणखी दोन साथीदार या गुन्ह्यात असल्याचे पोलिसांना सांगितले. त्यामुळे फरार असलेले दोन साथीदार पकडल्यानंतर या गुन्ह्यातील आणखी रक्कम जप्त होऊ शकते. त्यामुळे कळमना पोलिस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीnagpurनागपूर