लाेकमत न्यूज नेटवर्क
कन्हान : परिसरातून दुचाकी चाेरून नेणाऱ्या एका चाेरट्यास स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केली. त्याच्याकडून २० हजार रुपये किमतीची चाेरीची दुचाकी हस्तगत करण्यात आली आहे.
अजय ऊर्फ छाेटेलाल ताराचंद कनाेजे (वय ३०, रा. बिर्शी, ता. तिराेडा, जि. गाेंदिया) असे अटक करण्यात आलेल्या आराेपीचे नाव आहे. कन्हान पाेलीस ठाण्यात दाखल दुचाकी चाेरीच्या घटनेतील आराेपीचा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाकडून शाेध घेतला जात हाेता. दरम्यान, गुप्त माहितीच्या आधारे या आराेपीला ताब्यात घेत त्यास अटक करण्यात आली. त्याच्याकडून चाेरीची दुचाकी जप्त करण्यात आली.
याप्रकरणी आराेपीविरुद्ध गुन्हा नाेंदवून त्यास कन्हान पाेलिसांकडे सुपूर्द करण्यात आले. ही कारवाई स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक फाैजदार लक्ष्मीप्रसाद दुबे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली.