शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

वर्धेत दोन दुचाकी चोरट्यांना केले जेरबंद

By admin | Updated: May 30, 2017 17:26 IST

गोपनिय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सावंगी पोलिसांना दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे.

आॅनलाईन लोकमतवर्धा : गोपनिय माहितीच्या आधारे केलेल्या कारवाईत सावंगी पोलिसांना दोन दुचाकी चोरट्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. सदर चोरट्यांकडून पोलिसांनी चोरीच्या तब्बल आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. सलमान खाँ अजीज खाँ पठाण (२४) रा. कारला व शंकर कवडू पंधराम (२३) रा. गजानननगर असे अटक केलेल्या आरोपींची नावे असल्याचे पोलिसांनी सांगितले.अटक केलेल्या आरोपींपैकी एक आरोपी दररोज वेगवेगळी दुचाकी वापर असल्याची माहिती सावंगी पोलिसांना मिळली. त्या माहितीच्या आधारे पोलिसांनी सुरूवातीला शंकर पंधराम याला ताब्यात घेतले. पोलिसांनी अधिकची माहिती जाणून घेतली असता शंकर जवळ असलेल्या दुचाकीचे कागदपत्रे त्याच्या जवळ नसल्याचे पुढे आहे. सुरूवातीला उडवा-उडवीची उत्तरे देणाऱ्या शंकरला पोलिसी हिसका मिळताच त्याने गुन्ह्याची कबुली दिली.त्यांच्याकडून विविध ठिकाणावरून चोरलेल्या एकूण आठ दुचाकी जप्त केल्या आहेत. सलमान नागपुरातून तर शंकर दुचाकी चोरायचा वर्धेतूनअटकेत असलेले दोन्ही आरोपी वर्धा जिल्ह्यातील रहिवासी असले तरी सलमान हा नागपुरातील गर्दीच्या ठिकाणावरून तर शंकर हा वर्धेतील गर्दीच्या ठिकाणावरून दुचाकी लंपास करीत होता. नागपुरातून चोरलेली दुचाकी वर्धेत तर वर्धेतून चोरलेली दुचाकी विल्हेवाट लावण्यासाठी नागपुरात पाठविल्या जात असल्याचे पोलिसांच्या आतापर्यंतच्या तपासात समोर आले आहे.