नियम धाब्यावर बसवून धावतात ट्रॅव्हल्स :प्रवाशांचा जीव धोक्यात केवळ १८ स्लीपर कोचला मान्यतानागपुरात प्रादेशिक परिवहन कार्यालयाने केवळ १८ ‘टू बाय वन’ स्लीपर कोचला परवानगी प्राप्त आहे, परंतु ५०च्यावर ‘टू बाय टू’ स्लीपर कोच धावत असल्याची माहिती आहे. विशेष म्हणजे बाजूच्या राज्यात ‘टू बाय टू’ला मंजुरी आहे. ही वाहने नागपुरात येऊन व्यवसाय करीत आहे. यामुळे महाराष्ट्रातही या ‘टू बाय टू’ला मंजुरी देण्यात यावी, अशी येथील काही ट्रॅव्हल्स व्यावसायिकांची मागणी आहे. प्रादेशिक परिवहन कार्यालय (आरटीओ) या संदर्भात काय कारवाई करते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.नागपूर : राज्यात ‘टू बाय टू’ स्लीपर लक्झरी बसला परवानगी नाही. मात्र, दिवाळीच्या या सुट्यांमध्ये नियम धाब्यावर बसवून अशा बसेस सर्रास बेकायदा प्रवासी वाहतूक करीत आहेत. बसमधील गँगवेमध्ये अपुरी जागा, आपत्कालीन दरवाजाची जागाही स्लीपर बेडसाठी व्यापून टाकण्याचे प्रकार वाढल्याने अपघात झाल्यास प्रवाशांचा जीव धोक्यात येण्याची शक्यता आहे. राज्यात २०१० मध्ये ‘टू बाय वन’ स्लीपर कोचला परवानगी मिळाली. ‘टू बाय वन’ म्हणजे ड्रायव्हरच्या मागील बाजूस दोन व कंडक्टरच्या मागील बाजूस एक स्लीपर बेड, परंतु पैसे कमावण्याच्या हेतूने अनेक ट्रान्सपोर्ट कंपन्यांनी ‘टू बाय टू’ स्लीपर कोच तयार केले. म्हणजे ड्रायव्हरच्या आणि कंडक्टरच्या बाजूस दोन स्लीपर बर्थ तयार केले. वास्तविक ‘टू बाय टू ’ स्लीपर कोचला अद्याप आरटीओने मंजुरी दिलेली नाही. पण, तरीही सर्व नियम धाब्यावर बसवून या बस प्रवाशांना घेऊन धावत आहेत. नागपुरात अशा १५वर ट्रव्हल्स बसेस असल्याची माहिती आहे. (प्रतिनिधी)
‘टू बाय टू’ स्लीपरचा धंदा जोरात
By admin | Updated: November 15, 2015 02:04 IST