शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
4
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
5
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
6
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
7
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
8
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
9
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
10
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
11
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
12
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
13
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
14
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
15
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
16
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
17
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
18
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
19
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
20
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
Daily Top 2Weekly Top 5

दोन सख्ख्या बहिणींच्या खुनात आरोपीला दुहेरी जन्मठेप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 01:15 IST

सत्र न्यायालयाने दोन सख्ख्या बहिणींचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीला दुहेरी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला.

ठळक मुद्देनागपूर सत्र न्यायालयाचा निर्णय

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : सत्र न्यायालयाने दोन सख्ख्या बहिणींचा निर्घृण खून करणाऱ्या नराधम आरोपीला दुहेरी जन्मठेपेची कमाल शिक्षा सुनावली. न्यायाधीश विभा इंगळे यांनी हा निर्णय दिला.मोहम्मद कुतुबुद्दीन ऊर्फ सुभानी अंसारी वल्द कमरुद्दीन अंसारी (३०) असे आरोपीचे नाव असून तो सिवनी (मध्य प्रदेश) येथील रहिवासी आहे. आरोपीला भादंविच्या कलम ३०२ अंतर्गत दुहेरी जन्मठेप व एकूण ५० हजार रुपये दंड आणि दंड न भरल्यास एक वर्ष कारावास, कलम ३६३ अंतर्गत ७ वर्षे कारावास व ५००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास ३ महिने अतिरिक्त कारावास तर, कलम २०१ अंतर्गत ५ वर्षे कारावास व २००० रुपये दंड आणि दंड न भरल्यास १ महिना अतिरिक्त कारावास अशी शिक्षा सुनावण्यात आली. आरोपीने दोन जन्मठेपेची शिक्षा लागोपाठ भोगावी असा आदेश देण्यात आला आहे. त्यामुळे आरोपीची एक जन्मठेप संपल्यानंतर दुसरी जन्मठेप सुरू होईल.ही घटना २७ नोव्हेंबर २०१५ रोजी घडली होती. आरोपी हा मयत मुलींच्या काकाचा साळा होय. मयत मुलींचे वडील कामावर असताना आरोपीने त्यांना फोन करून मोटरसायकल मागितली. त्यानंतर आरोपी ती मोटरसायकल घेऊन मयत मुलींच्या घरी गेला. तेथून त्याने मुलींना सोबत नेऊन त्यांचा खून केला. जरीपटका पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविण्यात आल्यानंतर तत्कालीन पोलीस निरीक्षक बी. पी. सावंत यांनी प्रकरणाचा तपास करून आरोपीविरुद्ध न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. न्यायालयात सरकारतर्फे अ‍ॅड. नितीन तेलगोटे व अ‍ॅड. ज्योती वजानी यांनी कामकाज पाहिले.

टॅग्स :District Session court of Nagpurनागपूर जिल्हा व सत्र न्यायालयMurderखून