शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

नागपूर पोलिसांकडून दोन कुंटणखान्यावर छापे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 29, 2018 00:52 IST

गुन्हे शाखा आणि सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा मारून चार वारांगना पकडल्या. त्यांच्याकडून देहविक्रय करवून घेणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली.

ठळक मुद्देपाचपावली आणि सीताबर्डीत कारवाई : चार वारांगना सापडल्या, चार आरोपींना अटक

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : गुन्हे शाखा आणि सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळ्या ठिकाणी चालणाऱ्या कुंटणखान्यावर छापा मारून चार वारांगना पकडल्या. त्यांच्याकडून देहविक्रय करवून घेणाऱ्या चौघांना पोलिसांनी अटक केली.पहिली कारवाई पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील वैशालीनगरात झाली. हाऊसिंग बोर्ड कॉलनीतील रहिवासी सुनील वानखेडे हा गेल्या काही दिवसांपासून स्वत:च्या घरातच कुंटणखाना चालवित होता. गुन्हे शाखेच्या सामाजिक सुरक्षा पथकाला त्याची माहिती कळाल्यानंतर पोलीस उपायुक्त संभाजी कदम यांच्या मार्गदर्शनाखाली सामाजिक सुरक्षा पथकाने (एसएसबी) कारवाईचा सापळा रचला. शुक्रवारी दुपारी ४.३० च्या सुमारास पोलिसांनी सुनील वानखेडेकडे एक ग्राहक पाठविला. त्याने तीन हजार रुपये घेऊन त्याला दोन वारांगना दाखवल्या. त्यातील एकीला घेऊन ग्राहक वानखेडेच्या सदनिकेत गेले. ठरल्याप्रमाणे एसएसबीचे पोलीस निरीक्षक विक्रम गौड, सहायक निरीक्षक अनुपमा जगताप यांनी आपल्या सहकाºयांच्या मदतीने तेथे छापा मारला. यावेळी ग्राहकासोबत एक तर कुंटणखाना चालविणाºया सुनीलच्या सोबत असलेली दुसरी वारांगना पोलिसांच्या हाती लागली. सुनील पैशाचे आमिष दाखवून वेश्याव्यवसाय करवून घेत असल्याचे त्या वारांगनांनी पोलिसांनी सांगितले. त्यावरून पोलिसांनी सुनीलविरुद्ध पिटा कायद्यानुसार पाचपावली ठाण्यात गुन्हा दाखल केला.दुसरी कारवाई सीताबर्डीतील बहुचर्चित पकोडावाला गल्लीत झाली. नूतन लॉजमध्ये सीताबर्डी पोलिसांनी शुक्रवारी सायंकाळी ५.३० च्या सुमारास छापा मारून लॉजमालक शैलेंद्र कामडी (वय ३०), मीना कामडी (वय ५५, रा. पकोडावाला गल्ली) तसेच रमेश राऊत (वय ३६, रा. पारडी) या तिघांना अटक केली. नूतन लॉजमध्ये गेल्या अनेक दिवसांपासून वेश्याव्यवसाय सुरू असल्याची माहिती सीताबर्डी पोलिसांना मिळाली होती. त्यावरून पोलीस उपायुक्त चिन्मय पंडित, सहायक आयुक्त मराठे यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणेदार हेमंतकुमार खराबे यांनी कारवाईचा सापळा रचला. ठरल्याप्रमाणे लॉजमालक शैलेंद्र कामडीकडे एक ग्राहक पाठविण्यात आले. १५०० रुपयांच्या बदल्यात कामडीने एक वारांगना सोबत देऊन लॉजची रूमही उपलब्ध करून दिली. काही वेळेनंतर सीताबर्डीचे पोलीस उपानिरीक्षक ए. स्थूल आणि त्यांच्या सहकाºयांनी तेथे छापा मारून वारांगनेला ताब्यात घेतले. तिच्या माहितीवरून शैलेंद्र आणि मीना कामडी तसेच रमेश राऊत या तिघांना पिटा कायद्यानुसार अटक केली. १४ दिवसांत कुंटणखान्यावर झालेली ही ९ वी कारवाई आहे.

टॅग्स :sex crimeसेक्स गुन्हाraidधाड