शहरं
Join us  
Trending Stories
1
Shubman Gill Double Century : इंग्लंडच्या मैदानात 'द्विशतकी' खेळीसह शुबमन गिलनं रचला नवा इतिहास
2
थायलंडच्या निलंबित पंतप्रधान शिनावात्रा यांनी सत्ता वाचवण्यासाठी खेळला नवा 'डाव', नेमकं काय केलं?
3
त्रिभाषा समितीचे अध्यक्ष नरेंद्र जाधव यांनी स्पष्ट केली भूमिका; राज ठाकरेंबद्दल म्हणाले...
4
जगातील या 5 देशांमध्ये राहतात सर्वाधिक हिंदू! टॉप टेनमध्ये 3 मुस्लीम देशांचाही समावेश, चकित करणारी आहे आकडेवारी
5
दिशा सालियान प्रकरणी आदित्य ठाकरे स्पष्टच बोलले; म्हणाले, “गेल्या ५ वर्षांत ठराविक लोक...”
6
“धारावी पुनर्विकास की देवनार डम्पिंग डील? २,३६८ कोटींचा ‘कचरा प्रकल्प’ कोणाच्या फायद्याचा?”
7
लुटेरी दुल्हन! नवऱ्याला भाऊ बनवलं अन् दुसरं लग्न केलं; रोख रक्कम, दागिने घेऊन झाली पसार
8
एकाच ताटात किती जण जेवतात? शिवभोजन थाळी लाभार्थ्यांचा हा व्हिडीओ बघितला का?
9
आत्महत्या की हत्या? डॉक्टर महिलेच्या मृत्यू प्रकरणाची सखोल चौकशी करा- उपसभापती नीलम गोऱ्हे
10
पाकिस्तानी संघ भारतात येणार, आशिया कप खेळणार; केंद्र सरकारची परवानगी
11
"...म्हणून मी 'चला हवा येऊ द्या'मधून बाहेर पडलो", अखेर निलेश साबळेने सांगितलं खरं कारण
12
Viral Video : समुद्राची खोली दाखवण्यासाठी पाकिस्तानी पत्रकाराने काय केलं बघाच! तुम्हालाही हसू आवरणार नाही
13
छत्री तलाव येथे वाढदिवस साजरा करणाऱ्या तरुणाला 'भुता'कडून मारहाण? व्हिडीओ व्हायरल; पोलिस म्हणतात...
14
'आमच्या भारतात २५०० राजकीय पक्ष...', PM मोदींनी आकडा सांगताच घानातील सर्व नेते चक्रावले
15
कोण असतील पुढचे दलाई लामा? भारताने स्पष्ट शब्दात उत्तर दिलं; चीनलाही थेट सुनावलं! म्हणाले... 
16
२०२५मध्ये आतापर्यंत कोणत्या देशाने सर्वाधिक शस्त्रे खरेदी केली? यादीत भारताचा क्रमांक कितवा?
17
Criminal Justice 4: ‘माधव मिश्रा’ची साधी भोळी पत्नी, खऱ्या आयुष्यात 'फॅशन क्वीन' आहे खुशबू अत्रे ( PHOTOS )
18
भय इथले संपत नाही! तांदळामुळे कॅन्सरचा मोठा धोका? 'हा' राईस आहे सर्वात सुरक्षित
19
निलेश साबळेपाठोपाठ 'चला हवा येऊ द्या'मधून भाऊ कदमचीही एक्झिट, नेमकं कारण तरी काय?
20
अपात्र, दोषी लाडक्या बहि‍णींना पैसे परत द्यावे लागणार?; अदिती तटकरेंनी विधानसभेत काय सांगितले?

नागपुरातील दोन पोलीस अधिकाऱ्यांचे कोरोनामुळे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 12:23 IST

शहरातील दोन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भगवान शेजुळ व सिद्धार्थ सहारे यांचे गुरुवारी सकाळी कोरोना संसगार्मुळे दु:खद निधन झाले.

ठळक मुद्देकोरोनाचा वाढता संसर्ग

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर: शहरातील दोन कर्तव्यदक्ष पोलीस अधिकारी भगवान शेजुळ व सिद्धार्थ सहारे यांचे गुरुवारी सकाळी कोरोना संसगार्मुळे दु:खद निधन झाले. शहरात कोरोनाचा संसर्ग व मृत्यूचे प्रमाण वाढते असल्याने वैद्यकीय वर्तुळ व प्रशासनासमोरचे आव्हान वाढत आहे.शहर पोलीस दलात कार्यरत असलेल्या दोन पोलिसांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने सर्वत्र प्रचंड खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे, अवघ्या सव्वा दोन तासाच्या कालावधीत या दोन्ही मृत्यूच्या नोंदी झाल्या. 

पोलीस उपनिरीक्षक शेजुळ हे मुख्यालयात कार्यरत होते. ते २६ जुलै पासून प्रकृती अस्वास्थ्यामुळे कर्तव्यावर गेले नव्हते. ३१ जुलैला त्यांनी मुख्यालयाच्या वरिष्ठांना फोन वरून माहिती देऊन आपल्या गैरहजेरीचे कारण सांगितले. दरम्यान, ४ ऑगस्टला त्यांच्यावर योग्य उपचार होत नसल्याची बातमी पुढे आली. त्यामुळे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी दखल घेऊन त्यांना मेडिकलमध्ये दाखल केले. तेथे उपचार सुरू असताना गुरुवारी सकाळी ५.४० च्या सुमारास शेजुळ यांचा मृत्यू झाला.  तत्पूर्वी प्रतापनगरातील एका खासगी इस्पितळात दाखल असलेले सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सिद्धार्थ हरिभाऊ सहारे यांचा मृत्यू झाला.

 सहारे धंतोली पोलिस ठाण्यात कार्यरत होते. गेल्या आठवड्यात त्यांची प्रकृती चांगली वाटत नसल्यामुळे त्यांनी धंतोलीच्या वरिष्ठ पोलीस निरीक्षकांना माहिती देऊन सुट्टी मागितली. त्यानंतर ते रामदासपेठेतील खासगी इस्पितळात दाखल झाले. येथे प्रकृती जास्त झाल्यामुळे त्यांना प्रतापनगरातील खाजगी इस्पितळात पाठविण्यात आले. उपचार सुरू असताना डॉक्टरांनी गुरुवारी पहाटे ३.१५ च्या सुमारास सहारे यांना मृत घोषित केले. शेजुळ आणि सहारे यांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याचे वृत्त चर्चेला आल्याने पोलीस दलात प्रचंड खळबळ उडाली. माहिती कळताच पोलीस हॉस्पिटलचे प्रमुख डॉ. सतीश शिंदे यांनी शहानिशा करून घेतल्यानंतर पोलीस आयुक्तांना माहिती दिली. त्यानंतर या दोन्हीच्या मृत्यू बाबत परिमंडळ दोनच्या पोलीस उपायुक्त विनिता शाहू आणि परिमंडळ एकचे पोलीस उपायुक्त विवेक मासाळ यांनी कागदपत्रे ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली.

पोलिसांना धडकीविशेष म्हणजे, आतापर्यंत शहर पोलीस दलात ५० पेक्षा जास्त कोरोना बाधित पोलिसांची नोंद झाली. मात्र, मृत्यू झाल्याची आणि एकाच दिवशी दोन पोलिसांचा मृत्यू झाल्याने अवघ्या पोलिस दलाला धडकी भरली आहे.

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस