शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

हृदयद्रावक! खेळाडूंच्या अंगावर कोसळली वीज; शरीर पूर्णत: भाजल्यानं दोघांचा मैदानातच मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 10, 2021 20:24 IST

एक खेळाडू जखमी; खेळाडूवर रुग्णालयात उपचार सुरू; चनकापूर मैदानावरील घटना

खापरखेडा (नागपूर) : चनकापूर येथील मैदानावर सरावासाठी गेलेल्या खेळाडूंच्या अंगावर वीज कोसळली. यात दोघांचा मृत्यू झाला तर एक गंभीर जखमी झाला. अनुज कुशवाह (२२), तन्मय दहीकर (१२) अशी मृतांची नावे आहेत. हे दोघेही सावनेरमधील चनकापूर कॉलनीचे रहिवासी आहेत. सक्षम सुनील गोठीफोडे (१२) रा.पाचपावली, नागपूर असे जखमीचे नाव आहे. शुक्रवारी सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास ही घटना घडली.मिळालेल्या माहितीनुसार चनकापूर वेकोली वसाहत परिसरातील खेळाडू चनकापूर येथील मैदानावर नियमित सरावासाठी आले होते. दुपारी ३.४५ वाजताच्या सुमारास आकाशात काळे ढग दाटून आले. त्यावेळी मैदानावर काही मुले फुटबॉल तर काही धावण्याचा सराव करीत होती. ४.१५ वाजताच्या सुमारास पावसाला सुरुवात झाल्यानंतर मुलांनी मैदानातील शेडकडे धाव घेतली. यात धावक अनुज आणि फूटबाॅलपटू तन्मय आणि सक्षम मागे राहिले. तिघेही धावत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली. यामध्ये अनुज आणि तन्मय यांचे शरीर पूर्णत: भाजले गेले. त्यांचा मैदानातच मृत्यू झाला.सक्षमला उपचारार्थ नागपूर येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अनुज हा अभियांत्रिकी शाखेचा विद्यार्थी होता. तन्मयच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला होता. तेव्हापासून तो आणि त्याची आई त्याच्या काकाकडे चनकापूर येथे राहत होते. सक्षम हा नागपूरला राहतो. त्याच्या आजीचे निधन झाल्याने तो चनकापूर येथे आजोबांकडे आला होता. याप्रकरणी खापरखेडा पोलिसांनी अकस्मात मृत्यू नोंद घेतली आहे. पोलिसांनी घटनास्थळाचा पंचनामा करीत खेळाडूंचे मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात रवाना करण्यात आले. मृतांच्या कुटुंबाला शासनाकडून ४ लाख रुपयांची मदत दिली जाईल, अशी माहिती सावनेरचे तहसीलदार सतीश मसाळ यांनी दिली.