शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
4
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
5
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
6
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
7
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
8
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
9
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
10
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
11
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
12
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
13
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
14
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
15
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
16
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
17
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
18
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
19
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
20
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात  दोन पिस्तूल, २० काडतूस जप्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 4, 2019 00:52 IST

जरीपटका पोलिसांनी पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका गुन्हेगारांसह दोघांना अटक करून त्यांच्याजवळून दोन पिस्तूल आणि २० काडतूस जप्त केले. सध्या हे दोन्ही आरोपी जरीपटका पोलिसांच्या कस्टडीत असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत.

ठळक मुद्देजरीपटका पोलिसांची मध्य प्रदेशात धाव : पिस्तुलाची तस्करी करणाऱ्यांसह दोघे गजाआड

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर :जरीपटका पोलिसांनी पिस्तुलाची तस्करी करणाऱ्या मध्य प्रदेशातील एका गुन्हेगारांसह दोघांना अटक करून त्यांच्याजवळून दोन पिस्तूल आणि २० काडतूस जप्त केले. सध्या हे दोन्ही आरोपी जरीपटका पोलिसांच्या कस्टडीत असून, त्यांच्याकडून आणखी काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलीस वर्तवित आहेत.

बुधवारी दुपारी मेकोसाबाग लेंडी मैदानातील वाचनालयाजवळ पोलिसांनी शिनू मृगेसन शेट्टीयार (वय २१, रा. संत लहानुजीनगर, जरीपटका) याला अटक केली होती. कॉलेज बॅग घेऊन स्प्लेंडरवर एक तरुण वाचनालयाजवळ बसला आहे, त्याच्याजवळ पिस्तूल आहे, अशी माहिती बुधवारी दुपारी जरीपटका पोलिसांना मिळाली. त्यावरून पोलिसांनी तेथे जाऊन आरोपी शिनूला अटक केली होती. त्याच्याकडे पिस्तूल आणि दोन जिवंत काडतूस सापडले. चौकशीत हे पिस्तुल आणि काडतून मध्य प्रदेशातील ठाकूरकडून आणल्याचे शिनूने सांगितले होते. त्यावरून पोलिसांनी मध्य प्रदेशातील बडकुवा (जि. सागर) येथे छापा मारून राजकुमार भगवानसिंग ठाकूर (वय ४०) याला अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडे पोसिलांना एक पिस्तुल आणि १८ काडतूस सापडले. पोलिसांनी या दोघांना शस्त्रकायद्यानुसार गुन्हा दाखल करून अटक केली. शिनू आणि राजकुमारची ४ ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी मिळवली. परिमंडळ पाचचे उपायुक्त निलोत्पल यांच्या मार्गदर्शनाखाली जरीपटक्याचे ठाणेदार पराग पोटे, उपनिरीक्षक वसंत पवार, हवालदार गजेंद्रसिंग ठाकूर, नायक गणेश बरडे, आसिफ शेख, आनंद मरस्कोल्हे, रवी अहिर, गणेश गुप्ता, मुकेश यादव, पवन यादव आणि हरीश इंगळे यांनी ही कामगिरी बजावली.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीPolice Stationपोलीस ठाणेArrestअटक