शहरं
Join us  
Trending Stories
1
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
2
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
3
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
4
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
5
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
6
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
7
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
8
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
9
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
10
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
11
सोने-चांदीवरील आयात शुल्कात मोठी कपात! दागिन्यांचे दर उतरणार? तोळ्यामागे ११,७०० रुपयांचा दिलासा
12
शेतकरी ते उद्योजक! मुद्रा कर्जाच्या मदतीने उभा करा स्वतःचा व्यवसाय; जाणून घ्या अर्ज करण्याची प्रक्रिया
13
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
14
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
15
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
16
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
17
अखेर ट्रायम्फने ३५० सीसीची मोटरसायकल लाँच केली! जीएसटीचा फायदा अन् किंमत पाहून म्हणाल...
18
"काळजी करू नका, एकाही कार्यकर्त्याला वाऱ्यावर सोडणार नाही, दादांचा जनता दरबार..."; सुनेत्रा पवार यांचा शब्द
19
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
20
तरुणीचा 'शोले' स्टाईल ड्रामा! असं काय घडलं की मोबाईल टॉवरवर चढून तरुणीने घरच्यांना दिली धमकी?
Daily Top 2Weekly Top 5

भीषण अपघातात कामगाराचे दोन तुकडे; कंटेनर व ट्रकच्या मधे अडकला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 22, 2021 21:57 IST

Nagpur News ट्रकमध्ये ठेवलेल्या जनरेटरच्या प्रकाशात रोडचे काम करीत असताना भरधाव कंटेनरने त्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. या धडकेत एका कामगाराच्या शरीराचे दोन तुकडे झाले, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला.

नागपूर : ट्रकमध्ये ठेवलेल्या जनरेटरच्या प्रकाशात रोडचे काम करीत असताना भरधाव कंटेनरने त्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. या धडकेत एका कामगाराच्या शरीराचे दोन तुकडे झाले, तर दुसरा कामगार गंभीर जखमी झाला. हा भीषण अपघात सावनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सावनेर-कळमेश्वर मार्गावरील बोरगाव शिवारात गुरुवारी (दि.२१) रात्री ९.३० वाजताच्या सुमारास झाला.सचिन नत्थू कुंभारे (३२) असे मृत तर युवराज महादेव वानखेडे (५०) असे गंभीर जखमी कामगाराचे नाव आहे. हे दोघेही बोरगाव (बु.), ता. कळमेश्वर येथील रहिवासी आहेत. सध्या सावनेर-कळमेश्वर-गोंडखैरी या मार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू आहे. दोघेही डीबीएल कन्स्ट्रक्शन कंपनीच्या माध्यमातून या कामावर कामगार म्हणून काम करायचे. ते इतर कामगारांसोबत गुरुवारी रात्री या मार्गाचे काम करीत होते. प्रकाशासाठी एमपी-३९/एच-६९६ क्रमांकाच्या ट्रकमध्ये जनरेटर ठेवण्यात आले होते. त्या जनरेटरच्या प्रकाशात कामगार काम करीत होते.दरम्यान, वेगात आलेल्या एमपी-१३/जीबी-१७०७ क्रमांकाच्या कंटेनरने त्या ट्रकला मागून जोरात धडक दिली. त्यावेळी सचिन व युवराज त्या ट्रक व कंटेनरच्या मध्ये सापडले. या धडकेत सचिनच्या शरीराचे कंबरेपासून दोन तुकडे झाल्याने त्याचा घटनास्थळीच मृत्यू झाला तर युवराज गंभीर जखमी झाला.माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळ गाठून सचिनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेर येथील शासकीय रुग्णालयात आणला, तर युवराजला उपचारासाठी नागपूर येथील शासकीय रुग्णालयात भरती केले. याप्रकरणी सावनेर पोलिसांनी गुन्हा नोंदविला असून, या घटनेचा तपास ठाणेदार मारुती मुळूक यांच्या मार्गदर्शनात हेड कॉन्स्टेबल अनिल तिवारी करीत आहेत.मदतीला कुणी धावेनाअपघात होताच बोरगाव (बु.) येथील नागरिकांनी घटनास्थळी गर्दी केली होती. त्यातच पोलिसांना सूचना देण्यात आली. त्या गदीर्तील कुणीही सचिनच्या मृतदेहास अथवा जखमी युवराजला हात लावायला तयार नव्हते. शेवटी हितेश बन्सोड यांनी रुग्णवाहिकेसह घटनास्थळ गाठले. त्यांनी मित्रांच्या मदतीने सचिनचा मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी सावनेरला आणला व युवराजला नागपूरला हलविण्यासाठी मदत केली.

टॅग्स :Accidentअपघात