शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
4
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
5
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
6
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
7
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
8
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
9
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
10
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
11
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
12
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
13
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
14
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
15
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
16
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
17
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
18
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
19
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
20
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनमध्ये दारू दुकाने उघडण्याविरुद्ध नागपुरातील हायकोर्टात दोन अर्ज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 11, 2020 12:25 IST

लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देणे योग्य होणार नाही अशी भूमिका मांडणारे दोन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आले आहेत. अ‍ॅड. सतीश उके व अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांनी हे अर्ज दाखल केले आहेत.

ठळक मुद्देजनहित याचिकेला विरोधकोरोना संक्रमण वाढण्याची भीती व्यक्त

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडण्याची परवानगी देणे योग्य होणार नाही अशी भूमिका मांडणारे दोन अर्ज मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आले आहेत. अ‍ॅड. सतीश उके व अ‍ॅड. सुदीप जयस्वाल यांनी हे अर्ज दाखल केले आहेत. लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने सुरू केल्यास कोरोना संक्रमण वाढण्याची भीती त्यांनी व्यक्त केली आहे.मुख्यत्वे या दोन्ही अर्जांद्वारे अ‍ॅड. प्रकाश जयस्वाल, अ‍ॅड. कमल सतुजा, अ‍ॅड. मनोज साबळे व अ‍ॅड. श्रीरंग भांडारकर यांच्या जनहित याचिकेला विरोध करण्यात आला आहे. महापालिका आयुक्तांनी ३ मे रोजी जारी केलेल्या अधिसूचनेच्या वैधतेला या जनहित याचिकेद्वारे आव्हान देण्यात आले आहे. मनपा आयुक्तांनी संबंधित अधिसूचनेद्वारे लॉकडाऊनमध्ये विशिष्ट दुकाने उघडण्याची परवानगी दिली आहे. त्यात खासगी कार्यालये आणि दारूसह अन्य अनेक प्रकारच्या दुकानांचा समावेश नाही. त्यामुळे ती अधिसूचना अवैध असल्याचे जनहित याचिकाकर्त्यांचे म्हणणे आहे तर, अर्जदारांनी अधिसूचना कायद्यानुसार असल्याचे म्हटले आहे.तर कठोर अटी लागू कराजनहित याचिका मंजूर झाल्यास दारूची दुकाने सुरू करण्यासाठी विविध कठोर अटींसह परवानगी देण्यात यावी असे अ‍ॅड. उके यांनी अर्जात नमूद केले आहे. त्या अटींमध्ये केवळ लायसन्स असलेल्या व्यक्तीलाच दारू विकणे, नवीन लायसन्स देण्याकरिता दुप्पट शुल्क आकारणे, दारुवर ७५ ते ८० टक्के कोरोना कर लागू करणे, दारू खरेदी करणाऱ्या व्यक्तीला पोलीस स्टेशनमध्ये जाऊन लॉकडाऊनचे पालन करण्याचे हमीपत्र लिहून देणे बंधनकारक करणे, एका व्यक्तीला तीन दिवसाकरिता केवळ ७५० मिलि दारू विकणे, दारू दुकानांमध्ये शारीरिक अंतर व इतर नियमांचे काटेकोर पालन इत्यादी अटींचा समावेश आहे.वकिलांची प्रतिमा मलीन झालीवकील हे समाजाच्या अधिकारांसाठी भांडतात. नेहमी चांगल्या कामांसाठी धावून जातात. त्यामुळे समाज वकिलांचा आदर करतो. परंतु, शहरात प्रसिद्ध असलेल्या याचिकाकर्त्या वकिलांनी दारूची दुकाने उघडण्यासाठी जनहित याचिका दाखल केल्यामुळे समाजात वाईट संदेश गेला आहे. कोरोना संक्रमण वाढत असल्यामुळे समाजाचा लॉकडाऊनमध्ये दारूची दुकाने उघडण्यास विरोध आहे असे मत अ‍ॅड. उके यांनी व्यक्त केले आहे.याचिकाकत्यांकडून खर्च वसूल करावाया याचिकेमुळे दारूची दुकाने सुरू होऊन कोरोनाचे संक्रमण वाढल्यास त्याकरिता याचिकाकत्यांना दोषी ठरविण्यात यावे आणि त्यांच्याकडून कोरोना रुग्णांवरील उपचाराचा सर्व खर्च वसूल करण्यात यावा. तसेच, या कठीण काळात ही निरर्थक याचिका दाखल करून न्यायालयाचा वेळ व्यर्थ घालविण्यात आल्यामुळे याचिकाकर्त्यावर दावा खर्च बसविण्यात यावा, असे अ‍ॅड. जयस्वाल यांनी अर्जात म्हटले आहे. मनपाची अधिसूचना कायदेशीर आहे. करिता, त्याविरुद्धची जनहित याचिका खारीज करण्यात यावी अशी विनंतीही त्यांनी न्यायालयाला केली आहे.

 

टॅग्स :High Courtउच्च न्यायालय