शहरं
Join us  
Trending Stories
1
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
2
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
3
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
4
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
5
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
6
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
7
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
8
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
9
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
10
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
11
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
12
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
13
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
14
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
15
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय
16
व्हाईट बॉल क्रिकेटमध्ये स्मृती मानधनाची ऐतिहासिक कामगिरी, मेग लॅनिंगचाही विक्रम मोडला!
17
"पहलगाममधील मृतांच्या कुटुंबीयांना नागरी शौर्य पुरस्कार द्या"; सुप्रिया सुळेंचे CM फडणवीसांना पत्र
18
सूर्यकुमार अन् रायनचा झंझावात, नमन धिरनेही चोपले; लखनौसमोर 216 धावांचे आव्हान...
19
दहशतवादी हल्ल्यानंतर अतुल कुलकर्णी पोहोचले काश्मीरला, म्हणाले- "इथे सध्या सुरक्षित असून..."
20
"हिंमत असेल बोलून दाखवा की भारतीय सैन्यात..."; शहीद सैनिकाला निरोप देताना भावाचे अंगावर काटा आणणारे भाषण

नागपुरात दोन भीषण अपघातात चिमुकलीसह दोघे ठार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2018 10:31 IST

शुक्रवारी दुपारी उपराजधानीतील वेगवेगळ्या भागात घडलेल्या दोन भीषण अपघातात तीन वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू झाला.

ठळक मुद्देयशोधरानगरात तोडफोड, वाहन पेटविले धंतोलीतही तणाव

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शुक्रवारी दुपारी उपराजधानीतील वेगवेगळ्या भागात घडलेल्या दोन भीषण अपघातात तीन वर्षीय चिमुकलीसह दोघांचा मृत्यू झाला. अलीसबा अमरीन मोहम्मद अशरफ अन्सारी (वय ३ वर्षे) आणि नितीन जानराव राऊत (वय ४०) अशी मृतांची नावे आहेत. यशोधरानगर आणि धंतोली पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे दोन वेगवेगळे अपघात घडले. त्यामुळे दोन्ही ठिकाणी प्रचंड तणाव निर्माण झाला होता. यशोधरानगरात संतप्त जमावाने अपघातास कारणीभूत वाहनाची तोडफोड करून पेटवून दिले.पोलिसांच्या माहितीनुसार, यशोधरानगर निवासी मोहम्मद अशरफ अन्सारी हे वाहनचालक आहेत. त्यांच्या परिवारात पत्नी तसेच शिरीन कौसर आणि चिमुकली अलिसबा या दोन मुली होत्या. शिरीन घराजवळच्या शाळेत शिकायला जाते. नेहमीप्रमाणे ती शुक्रवारी शाळेत गेली. दुपारी १२.३० च्या सुमारास चिमुकली अलिसबा तिच्या शाळेत धावत धावत गेली. काही वेळेनंतर ती घराकडे परत येत असताना भरधाव वेगात आलेल्या मालवाहू वाहन क्रमांक एमएच ४९/ डी ५८९४ चा चालक शेख इसरार (वय ५०, रा. योगी अरविंदनगर) याने चिमुकल्या अलिसबाला चिरडले. ती जागीच गतप्राण झाली. त्यामुळे आरोपी वाहनचालकाने पळून जाण्याचा प्रयत्न केला. मात्र, अलिसबाचे काका मोहम्मद नफिस यांनी त्याला बाजूच्या लोकांच्या मदतीने पकडून बेदम चोप दिला. या अपघातामुळे परिसरात प्रचंड तणाव निर्माण झाला. संतप्त जमावाने अलिसबाचा बळी घेणाऱ्या दोषी वाहन चालकाला चोप देतानाच वाहनावर दगडफेक करून तोडफोड केली. त्यानंतर वाहनाला पेटवून दिले. माहिती कळताच यशोधरानगर पोलिसांचा ताफा घटनास्थळी पोहचला. त्यांनी जमावाला कसेबसे शांत केले. अग्निशमन दलाच्या मदतीने पोलिसांनी वाहनाची आग विझवली. त्यानंतर आरोपी शेख इसरारला ताब्यात घेऊन पोलिसांनी अटक केली.

आरोपी वाहनचालक बेधुंदअलिसबा शाळेतून परत जात असताना शिरिनच्या शिक्षिकेने तिला थांबण्यासाठी आवाज दिला. मात्र, चिमुकल्या अलिसबाला ते कळण्याचा प्रश्नच नव्हता. दुसरे म्हणजे, ती धावत निघाली अन् वेगात वाहन येताना दिसल्याने शिक्षिकेने चालकाला वाहन थांबवण्यासाठी आरडाओरड केली. मात्र, बेधुंदपणे वाहन चालविणाऱ्या आरोपी इसरारने त्याकडे दुर्लक्ष केले. त्याने मर्यादित वेगात वाहन चालविले असते आणि शिक्षिकेच्या आरडाओरडीकडे लक्ष दिले असते तर चिमुकलीचा जीव वाचला असता.

काँग्रेसनगरात झेरॉक्स सेंटर चालकाचा बळीअसाच दुसरा अपघात काँग्रेसनगर चौकाजवळ शुक्रवारी दुपारी १.३५ वाजता झाला. प्रतापनगरातील रहिवासी नितीन जानराव राऊत यांचे झेरॉक्स सेंटर आहे. कामाच्या निमित्ताने ते शुक्रवारी दुपारी त्यांच्या दुचाकीने (एमएच ३१/ ईएस ६१५६) धंतोलीत आले होते. काँग्रेसनगर चौकातून रहाटे कॉलनी मार्गाने ते परत जात असताना त्यांना सिमेंट काँक्रिंट मिक्सरच्या वाहनाने (एमएच ३४/ एबी ८२०४) जोरदार धडक मारली. नितीन मागच्या चाकात आल्याने त्यांचा जागीच करुण अंत झाला. अपघातानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. वातावरण तणावपूर्ण झाल्याचे कळताच धंतोलीचा पोलीस ताफा घटनास्थळी धावला. त्यांनी नितीनचा यांचा मृतदेह मेडिकलला पाठविला. त्यांचा बळी घेणारा आरोपी वाहनचालक लखन इंगळे याला धंतोली पोलिसांनी अटक केली.

टॅग्स :Accidentअपघात