शहरं
Join us  
Trending Stories
1
जम्मू-काश्मीर पोलिसांनी मोठी कारवाई, मुफ्ती इरफानला शोपियानमधून अटक; मोठे टेरर नेटवर्क उद्ध्वस्त
2
न्यायालयाचा दणका! महिलांना मारहाण व शिवीगाळ केल्याप्रकरणी पुणे पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश
3
लाल किल्ला स्फोटात मोठा खुलासा! सुरक्षा यंत्रणांच्या जोरदार कारवाईमुळे मोठा धोका टळला
4
शेख हसीनानंतर आता युनूस सरकारविरोधात विद्यार्थी रस्त्यावर; बांगलादेशात पुन्हा चळवळ सक्रिय
5
बिहारमध्ये प्रशांत किशोर यांची जनसुराज्य खाते उघडणार? ८ एक्झिट पोलमध्ये तेजस्वी यादवांचे गणित बिघडले
6
लग्नाला नऊ वर्षे पूर्ण झाली, पतीने आपल्याच मित्रासोबत पत्नीचे लग्न लावून दिले; धक्कादायक कारण आले समोर
7
बिहारमध्ये काँग्रेसला मोठा धक्का! दुसऱ्या टप्प्यातील निवडणूक संपताच मोठ्या नेत्याने दिला राजीनामा
8
Bihar Exit Poll : बिहारमध्ये उत्सुकता शिगेला! पहिला एक्झिट पोल आला, नितीश की तेजस्वी?
9
'तो शांत होता, त्याचे जास्त मित्र नव्हते'; दिल्ली बॉम्बस्फोटातील संशयित डॉक्टरच्या कुटुंबीयांची प्रतिक्रिया
10
राहुल द्रविडच्या लेकाची भारतीय U19 संघात वर्णी ; वैभव सूर्यवंशीचं नाव 'गायब' कारण...
11
छत्तीसगडच्या बीजापूरमध्ये मोठी चकमक, 6 नक्षलवादी ठार; मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त...
12
बॉसनं नोकरीवरून काढलं, पठ्ठ्यानं असं काही केलं की आता कंपनीला बसणार मोठा दंड!
13
फरीदाबाद मॉड्यूलचा खरा मास्टरमाईंड आला समोर; डॉक्टरांना कट्टरपंथी बनवणारा मौलवी इरफान अहमद कोण?
14
Travel : भारताशी कनेक्शन, 'या' देशात जाताच करोडपती व्हाल! परदेशवारीचा प्लॅन करताय तर नक्की विचार करा
15
ती चूक यामाहा नाही करणार...! पहिली वहिली इलेक्ट्रीक स्कूटर आली!  Aerox लूक; इतकी रेंज देणार की...
16
Delhi Red Fort Blast : जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्याचे कॉल डिटेल्स उघड; दिल्ली स्फोटाचं रहस्य उलगडलं, उमरने ‘तारिक’ नावाने घेतलं सिम कार्ड
17
Yamaha ची नव्या जमान्याची RX100...! स्टायलिश बाईक लाँच; किंमत फक्त ₹ १.** लाख!
18
IND vs SA : ईडन गार्डन्सच्या खेळपट्टीवर गंभीर नाराज; गांगुलीनं असं दिलं उत्तर
19
संत्र्याच्या साली कचरा समजून फेकून देता, थोडं थांबा... त्वचेसह घरालाही होईल मोठा फायदा
20
दिल्ली स्फोट प्रकरणात नवा खुलासा; डॉ. शाहीन अन् डॉ. परवेज सख्खे भाऊ बहीण, तपासात काय सापडलं?

पुन्हा आठ तासात दोघांना केले ठार; हत्यासत्राने नागपूर दहशतीत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 24, 2017 00:32 IST

शहरातील विविध भागात गेल्या महिनाभरापासून हत्यासत्र सुरू झाल्याने नागपूरकर दहशतीत आले आहे. मंगळवारी २१ नोव्हेंबरला राहुल आग्रेकर नामक तरुणाचे लकडगंज भागातून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे शहरात थरार निर्माण झाला असतानाच आज गुरुवारी पुन्हा ८ तासात दोघांच्या हत्या झाल्या.

ठळक मुद्देदोन्ही हत्या डोक्यांवर प्रहार करून

आॅनलाईन लोकमतनागपूर : शहरातील विविध भागात गेल्या महिनाभरापासून हत्यासत्र सुरू झाल्याने नागपूरकर दहशतीत आले आहे. मंगळवारी २१ नोव्हेंबरला राहुल आग्रेकर नामक तरुणाचे लकडगंज भागातून अपहरण करून त्याची हत्या करण्यात आली. या प्रकारामुळे शहरात थरार निर्माण झाला असतानाच आज गुरुवारी पुन्हा ८ तासात दोघांच्या हत्या झाल्या. त्यामुळे पोलिसातही खळबळ उडाली आहे.गुरुवारी सकाळी दिनेश धरमसिंग उईके (वय ३०, रा. दाते ले-आऊट) आणि दिनेश अशोक कोटांगळे (वय २५, रा. पन्नासे ले-आऊट) हे दोघे प्रतापनगरातील मजुरांच्या ठिय्यावर उभे होते. काम न मिळाल्याने ते सोबतच दारू प्यायला गेले. त्यानंतर दुपारी २ च्या सुमारास मेंढे ले-आउटमधील रचना अपार्टमेंटजवळ त्यांच्यात वाद सुरू झाला. उईकेने कोटांगळेच्या पत्नीला उद्देशून शिवीगाळ केली. त्यामुळे चिडलेल्या कोटांगळेने उईकेच्या डोक्यावर दगडाने ठेचून त्याची हत्या केली. त्यानंतर पळून गेला. माहिती कळताच सोनेगाव पोलीस घटनास्थळी पोहचले. त्यांनी शोधाशोध करून आरोपीला अटक केली.दुसरी घटना रात्री १० च्या सुमारास खलासी लाईन, सदरमध्ये घडली. आरोपी प्रवीण चरणदास हुमणे आणि मृत अविनाश अरविंद मेहरा (वय ३३) हे दोघे साळे-भाटवे होय. ते मिलिंद तायवाडेच्या घरी भाड्याने राहत होते. मृत मेहराला दारूचे व्यसन होते. तो घरी आल्यानंतर पत्नीला बेदम मारहाण करायचा. गुरुवारी रात्री असेच झाले. मेहरा दारूच्या नशेत आला आणि त्याने पत्नीला बेदम मारहाण करायला सुरुवात केली. तिचे दोन आठवड्यांपूर्वीच आॅपरेशन झाले आहे. ती वेदनांनी तडफडत भावाच्या घरी गेली. तिच्या मागेच मेहरा आला. ते पाहून त्याचा साळा प्रवीण याने बाजूची काठी उचलून मेहराच्या डोक्यावर मारली. एकाच फटक्यात मेहरा खाली पडला आणि गतप्राण झाला. आरडाओरड ऐकून बाजूची मंडळी धावली. त्यांनी सदर पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पळून जाण्याच्या तयारीतील आरोपी प्रवीणला अटक केली.