शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
4
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
5
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
6
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
7
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
8
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
9
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
10
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
11
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
12
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
13
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
14
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
15
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
16
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
17
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
18
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
19
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
20
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
Daily Top 2Weekly Top 5

तो दोन महिन्याचा चिमुकला निगेटिव्हच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 17, 2020 00:55 IST

आई पॉझिटिव्ह तर दोन महिन्याचा चिमुकला निगेटिव्ह होता. चिमुकल्याला निगेटिव्ह ठेवण्याचे आव्हान एका निवासी डॉक्टरने स्वीकारले. त्या मातेचे समुपदेशन करीत तिला आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. परंतु १४ दिवसांनंतर त्या मातेचा नमुना पुन्हा पॉझिटिव्ह आला. आणखी काही दिवस तिला रुग्णालयात राहावे लागणार होते. परंतु त्या डॉक्टरने व मातेने हार मानली नव्हती. अखेर आज त्या महिलेचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. सलग २० दिवस पॉझिटिव्ह मातेजवळ राहूनही चिमुकल्याला निगेटिव्ह ठेवण्यास त्या दोघांनाही यश आले.

ठळक मुद्देपॉझिटिव्ह आईजवळ होता २० दिवस : मेयोच्या निवासी डॉक्टरांनी घेतली विशेष काळजी

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर : आई पॉझिटिव्ह तर दोन महिन्याचा चिमुकला निगेटिव्ह होता. चिमुकल्याला निगेटिव्ह ठेवण्याचे आव्हान एका निवासी डॉक्टरने स्वीकारले. त्या मातेचे समुपदेशन करीत तिला आवश्यक वस्तू उपलब्ध करून दिल्या. परंतु १४ दिवसांनंतर त्या मातेचा नमुना पुन्हा पॉझिटिव्ह आला. आणखी काही दिवस तिला रुग्णालयात राहावे लागणार होते. परंतु त्या डॉक्टरने व मातेने हार मानली नव्हती. अखेर आज त्या महिलेचे दोन्ही नमुने निगेटिव्ह आले. सलग २० दिवस पॉझिटिव्ह मातेजवळ राहूनही चिमुकल्याला निगेटिव्ह ठेवण्यास त्या दोघांनाही यश आले. त्या मातेच्या चेहऱ्यावर कृतज्ञतेचे भावर तर डॉक्टरच्या चेहऱ्यावर समाधान होते.सतरंजीपुरा येथील त्या महिलेच्या कुटुंबाला सिम्बॉयसीस येथे क्वारंटाईन केले होते. दोन महिन्यांच्या चिमुकल्यासह तिचा व पतीचा नमुना तपासण्यात आला. अहवालात मात्र तिचा एकटीचा नमुना पॉझिटिव्ह आला. २८ एप्रिल रोजी त्या मातेला व तिच्या दोन महिन्याच्या चिमुकल्याला मेयोत दाखल केले. परंतु मुलाला सोबत ठेवता येणार नाही, असे सांगून चिमुकल्याला क्वारंटाईन असलेल्या पतीकडे पाठविले. त्या दिवशी तो चिमुकला दिवसभर दुधासाठी रडला. याची माहिती पतीने पत्नीला फोनवरून दिली. त्या मातेने याची माहिती डॉ. बन्सल यांना देऊन बाळाला सोबत ठेवण्याची विनंती केली. त्या चिमुकल्याला आणखी तिसरी व्यक्ती पाहण्यासाठी नव्हती. डॉ. बन्सल यांनी याची माहिती वरिष्ठांना दिली. ते बाळ निगेटिव्ह ठेवण्याच्या अटीवर वरिष्ठांनी परवानगी दिली. डॉ. बन्सलनी त्या मातेला कोरोनाची माहिती दिली. शरीराची, कपड्याची स्वच्छता कशी राखायचे ते सांगितले. एवढ्यावरच ते थांबले नाही स्वत:च्या पैशातून टॉवेलपासून ते साबण, सॅनिटायझर आणून दिले. विशेषत: दूध पाजताना काय काळजी घ्यावी याची माहिती दिली आणि नंतर तिच्याकडे बाळ सुपूर्द केले. डॉ. बन्सल आणि त्या मातेने बाळला कोरोनामुक्त ठेवण्याचे आव्हान स्वीकारले होते. यामुळे आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात होती. १४ दिवसानंतर त्या मातेचे नमुने तपासण्यात आले. परंतु तिचा पहिला नमुना निगेटिव्ह तर दुसरा पॉझिटिव्ह आला. यामुळे पुन्हा काही दिवस रुग्णालयात काढावे लागले. मात्र दोघांनी हार मानलेली नव्हती. पाचव्या दिवशी तपासलेले दोन्ही नमुने निगेटिव्ह आल्याने त्या महिलेला आज रुग्णालयातून सुटी देण्यात आली. दोन महिन्याच्या बाळाला निगेटिव्ह ठेवण्याचे आव्हान पूर्ण केल्याने डॉ. बन्सल यांना आपले कर्तव्य पार पाडल्याचा अभिमान होता. डॉ. बन्सल यांना या प्रकरणात अधिष्ठाता डॉ. अजय केवलिया, वैद्यकीय अधिक्षक डॉ. रवी चव्हाण व उपवैद्यकीय अधीक्षक डॉ. सागर पांडे यांनी सहकार्य केले.

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याnagpurनागपूर