शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

दोन लाख पोलीस कुटुंब आघाडी सरकारवर नाराज

By admin | Updated: August 28, 2014 01:58 IST

महसूल खात्याच्या तुलनेत सहाव्या वेतन आयोगातील तफावत दूर न झाल्याने महाराष्ट्रातील दोन लाख पोलीस व त्यांचे कुटुंबीय काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर नाराज आहेत

वेतनातील तफावत : महासंचालकांचेही मुख्यमंत्र्यांना साकडेराजेश निस्ताने - यवतमाळ महसूल खात्याच्या तुलनेत सहाव्या वेतन आयोगातील तफावत दूर न झाल्याने महाराष्ट्रातील दोन लाख पोलीस व त्यांचे कुटुंबीय काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी सरकारवर नाराज आहेत. या नाराजीचा फटका दोन्ही पक्षांना आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे. आम्हालाही महसूल खात्याप्रमाणे सहाव्या वेतन आयोगात वेतनश्रेणी द्यावी, अशी राज्यातील पोलीस शिपाई ते पोलीस निरीक्षकापर्यंतचे तमाम पोलीस कर्मचारी व अधिकाऱ्यांची मागणी आहे. परंतु या मागणीकडे काँग्रेसचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, राष्ट्रवादीचे गृहमंत्री आर.आर. पाटील, अर्थमंत्री अजित पवार सातत्याने दुर्लक्ष करीत आहेत. महसूल व पोलिसातील पदांची श्रेणी समान आहे, महसुलापेक्षा अधिक काळ आणि धोक्याची नोकरी करूनही वेतनात तफावत का असा पोलिसांचा सवाल आहे. सरकार लक्ष देत नाही म्हणून काही पोलीस निरीक्षकांनी पुढाकार घेत हे प्रकरण ‘मॅट’मध्ये (महाराष्ट्र प्रशासकीय लवाद) नेले. परंतु गेल्या कित्येक वर्षांपासून शासन तेथे आपली बाजू मांडण्यास टाळाटाळ करीत आहे. वारंवार सरकारी पक्ष तारखा वाढवून घेत आहे. या याचिकेवर पोलीस महासंचालकांनी शपथपत्र दाखल केले असून महसूल विभागाप्रमाणे पोलिसांनाही वेतनश्रेणी देण्याबाबत अनुकुलता दर्शविली आहे. तत्कालीन महासंचालक डी.शिवानंदन यांनी तर पाच पानाचे शपथपत्र दाखल करून वेतनातील तफावत दूर करण्याबाबत जोरदार समर्थन केले होते. राज्याचे विद्यमान पोलीस महासंचालक संजीव दयाळ यांनीसुद्धा मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नुकत्याच झालेल्या सहामाही आढावा बैठकीत वेतनातील तफावतीचा मुद्दा उपस्थित केला. त्यावर मुख्यमंत्र्यांनी ‘पाहू, करू’ एवढीच प्रतिक्रिया व्यक्त केली. पोलिसांकडून २४ तास ड्युटी, सुट्यांचा अभाव, नागरिकांची सुरक्षा आदी अपेक्षा सरकार ठेवत असताना त्यांना महसूलच्या बरोबरीने वेतन देण्यास तयार नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील सुमारे दोन लाख पोलीस कर्मचारी व त्यांचे कुटुंबीय आघाडी सरकारच्या कारभारावर नाराज आहेत. त्यांच्या या नाराजीचा फटका सत्ताधारी पक्षाला आगामी निवडणुकीत बसण्याची दाट शक्यता आहे.