शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

खाद्यान्न तपासणीच्या कामासाठी दोन प्रयोगशाळा?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 10, 2020 10:33 IST

खाद्यपदार्थ आणि औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीचे काम शासकीय प्रयोगशाळेला देणाऱ्या एफडीएतर्फे नवीन प्रयोगशाळा आणि कार्यालयासाठी इमारत बांधण्यात येत आहे.

ठळक मुद्देएफडीए व शासकीय प्रयोगशाळेत अर्धे कर्मचारी पाचमजली इमारतीचे बांधकाम सुरू

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : खाद्यपदार्थांच्या तपासणीसाठी शासकीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेसह दोन वर्षांपासून अन्न व औषध प्रशासन (एफडीए) विभागाची प्रयोगशाळा सुरू आहे. एकाच कामासाठी राज्य शासनाच्या दोन प्रयोगशाळा कशाला, हा प्रश्न या निमित्ताने उभा राहिला आहे.नासुप्र कार्यालयाच्या बाजूला सरकारी प्रयोगशाळेची तीनमजली इमारत तयार आहे. त्यातील अनेक खोल्या रिक्त आहेत. केमिस्ट व तंत्रज्ञासह सध्या पाच कर्मचारी कार्यरत आहेत. खाद्यपदार्थ आणि औषधांच्या नमुन्यांच्या तपासणीचे काम शासकीय प्रयोगशाळेला देणाऱ्या एफडीएतर्फे नवीन प्रयोगशाळा आणि कार्यालयासाठी इमारत बांधण्यात येत आहे. सध्या एफडीएची प्रयोगशाळा आणि कार्यालय भाडेतत्त्वावर आहे. कार्यालय लहान असल्याने फायली योग्यरीत्या ठेवता येत नाहीत.सिव्हिल लाईन्समध्ये मेट्रो कार्यालयाजवळ एफडीएच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. सध्या काम बंद आहे. यादरम्यान एफडीएचे कार्यालय आणि प्रयोगशाळेचे भाडे देण्यात येत आहे. एफडीएच्या कर्मचाऱ्यांना नमुने घेऊन शासकीय प्रयोगशाळेत जावे लागते. एफडीए आणि शासकीय सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत जवळपास अर्धेच कर्मचारी आहेत. या दोन्ही प्रयोगशाळेतील कर्मचारी एकत्रित केल्यास संख्या पूर्ण होईल. कर्मचाऱ्यांची स्वीकृत संख्या ३२ असून त्यापैकी १५ कर्मचारीच आहेत. कोविड-१९ करिता कार्यालय प्रमुख आणि अन्य कर्मचाऱ्यांना दुसऱ्या जागेची जबाबदारी दिल्याने येथे दररोज ५ कर्मचारी असतात. एफडीए प्रयोगशाळेची हीच स्थिती आहे.

मार्चमध्ये केवळ २४ नमुनेलॉकडाऊनमध्ये मार्च महिन्यात एफडीएने शासकीय प्रयोगशाळेला २४ नमुने पाठविले. या महिन्यात सर्वाधिक नमुने पाठविण्यात येत असल्याची माहिती आहे. पण दोन वर्षांत एफडीएतर्फे कमी नमुने येतात. लॉकडाऊनमध्ये खाद्यपदार्थांची वाढती मागणी आणि भेसळीच्या तक्रारीनंतरही कारवाई कमीच झाली. याकरिता कर्मचाऱ्यांच्या कमतरतेची कारणे एफडीएतर्फे दिली जातात. कर्मचाऱ्यांची कमतरता आणि कमी कारवाई होत असतानाही एफडीएला पाच माळ्यांच्या इमारतीची गरज काय, असा सवाल आहे.

काम केव्हा पूर्ण होणार, हे सांगणे कठीणएफडीएचे कार्यालय आणि प्रयोगशाळा भाडेत्तत्वावर आहे. मोठी जागा हवी आहे. नवीन कार्यालयासह प्रयोगशाळेसाठी नवीन इमारतीचे बांधकाम सुरू आहे. बांधकाम केव्हा पूर्ण होणार, हे सांगता येणार नाही.-चंद्रकांत पवार, सहआयुक्त (अन्न), एफडीए.

टॅग्स :Food and Drug administrationअन्न व औषध प्रशासन विभाग