शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

रोजगाराच्या शोधात आलेल्या तरुणीवर ऑटोचालकासह दोघांचा बलात्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 16:06 IST

Nagpur News कामाच्या शोधात आपल्या गावाहून नागपुरात आलेल्या एका तरुणीवर ऑटो चालकासह दोघांनी बलात्कार केला. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार तरुणीने गुरुवारी सायंकाळी कपिलनगर पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना रात्री अटक केली.

ठळक मुद्देदोन महिन्यांनंतर प्रकरण उघड कपिलनगरात गुन्हा दाखल आरोपी गजाआड 

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : कामाच्या शोधात आपल्या गावाहून नागपुरात आलेल्या एका तरुणीवर ऑटो चालकासह दोघांनी बलात्कार केला. दोन महिन्यांपूर्वी घडलेल्या या घटनेची तक्रार तरुणीने गुरुवारी सायंकाळी कपिलनगर पोलिसांकडे नोंदविली. पोलिसांनी दोन्ही आरोपींना रात्री अटक केली.

मोहम्मद शहाबाज इस्माईल शेख (वय २७, कामठी) आणि मोहम्मद सलीम शेख (वय २७, कामगार नगर) अशी आरोपींची नावे आहेत. तक्रार करणारी तरुणी (वय २१) कन्हान आणि पारशिवनीच्या मध्ये असलेल्या एका खेड्यात राहते. ती बारावी शिकलेली असून रोजगार शोधण्यासाठी नेहमी नागपूरला येत जात होती. आरोपी शहबाज हा कामठी ते नागपूर ऑटो चालवतो. त्याच्या ऑटोत नेहमी येत असल्याने तरुणीची त्याच्याशी ओळख होती. २१ जानेवारीला ती काम शोधण्यासाठी गांधीबागमध्ये आली होती. यावेळी तिचा मोबाईल हरवला.

२५ फेब्रुवारीला दुपारी ३ वाजता ती आरोपी शहबाजच्या ऑटो तून नागपूरला येत असताना तिने त्याला आपला मोबाईल हरवल्याचे सांगितले. त्याने तिचा मोबाईल शोधून देतो असे सांगून तिला नागपुरात फिरवले. खाणे-पिणेही केले. त्यानंतर रात्र झाल्यामुळे तरुणीने गावाला जाण्याऐवजी नागपुरातच मुक्काम करण्याची इच्छा बोलून दाखविली. ती स्वतः मुक्काम करण्याची तयारी दाखवत असल्यामुळे शहबाजची नियत फिरली. त्याने त्याचा मित्र आरोपी सलीम शेख याला बोलवून मुक्कामासाठी जागा शोधायला सांगितले.

सलीमने कपिल नगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील भिलगाव कामठी मार्गावरील एका टिनाच्या घरात या दोघांना नेले. तेथे शहबाज आणि सलीमने त्या तरुणीवर रात्रभर बलात्कार केला. तिला दुसऱ्या दिवशी सकाळी कन्हानला सोडून दिले. दरम्यान, या घटनेला दोन महिने झाले. गुरुवारी सकाळी मुलीचे विचित्र वर्तन पाहून तिच्या आईने तिला खोदून खोदून विचारले असता आरोपी शहबाज तसेच सलीमने दोन महिन्यापूर्वी रात्रभर बलात्कार केल्याची माहिती तिने आईला दिली. परिणामी तरुणीची आई तिला कपिलनगर पोलीस ठाण्यात घेऊन आली. येथे तरुणींनी दिलेल्या तक्रारीवरून कपिलनगर पोलिसांनी आरोपी शहाबाज तसेच सलीमविरुद्ध तरुणीचे अपहरण करून तिच्यावर सामूहिक बलात्कार केल्याच्या आरोपाखाली गुन्हा दाखल केला. त्यांना रात्रीच अटक करण्यात आली.यापूर्वीही घडल्या घटना बाहेरगावच्या मुली अथवा महिलेवर आटोचालकांनी सामूहिक बलात्कार केल्याच्या अनेक घटना नागपूर शहरात यापूर्वी घडल्या आहेत. बाहेरगावच्या तरुणी अथवा महिलांची असहायता लक्षात घेऊन आरोपी ऑटोचालक मदत करण्याच्या नावाखाली त्यांना निर्जन ठिकाणी नेतात. तेथे त्यांच्यावर साथीदारांसह बलात्कार करतात आणि दुसऱ्या ठिकाणी नेऊन सोडतात. पीडित महिला अथवा मुलगी बाहेरगावची असल्यामुळे त्यांना घटनास्थळसंबंधी माहिती नसते. बदनामीच्या धाकाने त्या पोलिसांकडे जाण्याचे टाळतात. त्यामुळे अनेक गुन्ह्यांची नोंद होत नाही. नागपुरात यापूर्वी सीताबर्डी, हिंगना, भिलगाव, कामठी, जरीपटका अशा अनेक भागात ऑटो चालकांनी बाहेरगावच्या महिला, मुलींवर बलात्कार केल्याचे गुन्हे घडले आहेत.---

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारी