शहरं
Join us  
Trending Stories
1
अंतराळातून भारताचे तेजस्वी दर्शन; दररोज १६ सूर्योदय, १६ सूर्यास्त पाहातो; अंतराळवीर शुभांशू यांना पंतप्रधानांचा व्हिडीओ कॉल
2
मोठी बातमी: विद्यार्थिनीचा लैंगिक छळ करणाऱ्या विजय पवार, प्रशांत खाटोकरला बीड पोलिसांनी ठोकल्या बेड्या
3
बाबासाहेबांना एकच संविधान अभिप्रेत असल्याने कलम ३७० हटवण्यावर मोहर
4
दहशतवादी साकिब नाचनचे दिल्लीत निधन, सिमी, इसिससाठी काम; ‘तिहार’मध्ये बिघडली प्रकृती
5
दोन ठाकरे एकत्र येणार की निर्णयच बदलणार?
6
त्यांनी घरून मोबाइलवर केले मतदान, आपला नंबर कधी ?
7
रीलसाठी आयफोनची चोरी; फोनमालकाचा चिरला गळा
8
‘कांटा लगा’ फेम शेफालीचा मृत्यू कशामुळे?, प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच मृत्यू
9
आधी कारने उडवले, मग शस्त्राने भोसकले; अमरावतीत पोलिस अधिकाऱ्याचा खून
10
शिंदे गटाचे नेते तानाजी सावंत यांची प्रकृती बिघडली; रुग्णालयात दाखल, ICUमध्ये उपचार सुरू
11
ENG W vs IND W : स्मृतीच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाचा मोठा विजय; इंग्लंडवर ओढावली नामुष्की
12
स्मृती मानधनानं पहिल्या टी-20I सेंच्युरीसह रचला इतिहास, असा पराक्रम करणारी ती पहिलीच
13
एअर इंडियाच्या विमानात बसला, दारू प्यायला अन् महिला कर्मचाऱ्यासोबत... ; लँडिंग होताच प्रवासी पोलिसांच्या ताब्यात!
14
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
15
भारताचा बांगलादेशला मोठा झटका, 'या' गोष्टीवर घातली बंदी! का घेतला मोठा निर्णय?
16
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
17
आता आणखी कोण? काँग्रेसचा मोठ्या पदावरील बडा नेता भाजपात जाणार? निवडणुकीपूर्वी धक्का बसायची चिन्हे
18
पैसे तयार ठेवा! लवकरच येणार Meesho चा IPO, काय आहे कंपनीचा प्लान? पाहा डिटेल्स 
19
मुंबईचे डबेवाले एक दिवसाच्या सुट्टीवर जाणार! काय आहे कारण? जाणून घ्या...
20
“तुमचा वाईट पद्धतीने पराभव केला, तुम्ही आता नरकात...”; ट्रम्प यांचा खामेनी यांच्यावर प्रहार

पाचपावलीत दोन गटांत सशस्त्र हाणामारी, दोन गंभीर जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 21, 2018 21:04 IST

दोन गटांत निर्माण झालेल्या वादानंतर दोन्हीकडून एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटातील चार जण जखमी झाले. त्यातील दोघांची अवस्था गंभीर आहे.

नागपूर : दोन गटांत निर्माण झालेल्या वादानंतर दोन्हीकडून एकमेकांवर सशस्त्र हल्ला चढवण्यात आला. त्यामुळे दोन्ही गटातील चार जण जखमी झाले. त्यातील दोघांची अवस्था गंभीर आहे. पाचपावली पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री ११.३० वाजता ही घटना घडली.बाबा बुद्धाजी नगरातील रहिवासी बिपीनदिपसिंग निर्मलसिंग जस्सल (२७) आणि देवीनगरातील रहिवासी कोमलदीपसिंग सुलतानसिंग संधू (२२) यांच्यात गेल्या काही दिवसांपासून वाहन खरेदीच्या व्यवहारातून वाद सुरू आहे. त्यावरून कोमलने फोन करून जस्सलला एका रेडिमेड कपड्याच्या दुकानासमोर शनिवारी रात्री ११.३० ला बोलविले.यावेळी दोघांचे नातेवाईकही समोरासमोर आले. त्यांच्यात वाद सुरू होताच त्यांनी कृपाण (कट्यार) तसेच दगडाने एकमेकांवर जोरदार हल्ला चढवला. कोमल संधू, चंचल संधू , जगदीप संधू आणि त्याच्या भावाने बिपिनदीपसिंगच्या डोक्यावर तसेच पोटावर किरपानचे घाव घातले. तर कवी जस्सल, त्याचा भाऊ, वडील आणि आईने कोमलदीपसिंगवर किरपानने हल्ला चढवून त्याला खाली पाडले आणि त्याचे डोके दगडाने ठेचण्याचा प्रयत्न केला. या सशस्त्र हाणामारीमुळे परिसरात दहशत निर्माण झाली. शेजा-यांनी धाव घेऊन त्यांना एकमेकांपासून दूर केले. त्यानंतर दोन्ही गटाकडून पाचपावली ठाण्यात तक्रार नोंदवण्यात आली. सहायक पोलीस निरीक्षक एम. एस. राखुंडे यांनी दोन्ही गटांतील उपरोक्त आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला.पुण्याचे पोलीस नागपुरातसंधू गटातील आरोपी आॅटो डील करतात तर गटातील एका आरोपीवर पुणे (ग्रामीण) ग्रामीणमध्ये ट्रक चोरीचा गुन्हा दाखल आहे. दोन दिवसांपूर्वी पुण्याचे पोलीस नागपुरात आरोपीच्या शोधासाठी आले होते. हे कळाल्याने शेजा-यांमध्ये उलटसुलट चर्चा सुरू झाली. आपली बदनामी विरोधी गटातील मंडळी करीत असल्याचा संशय आल्याने वाद वाढला अन् नंतर सशस्त्र हाणामारीची घटना घडली.