बेपत्ता झालेल्या मुलींमध्ये एक १६, तर दुसरी १३ वर्षांची आहे. रविवारी दुपारी २च्या सुमारास साखर आणायला जातो, असे सांगून या दोन बहिणी घराबाहेर पडल्या. सायंकाळ झाली तरी त्या परत आल्या नाही. त्यामुळे घरच्यांनी शोधाशोध सुरू केली. त्यानंतर प्रतापनगर पोलिसांकडे तक्रार नोंदवली. एकाच घरातील दोन अल्पवयीन मुली बेपत्ता झाल्याची तक्रार मिळताच पोलिसांनी तात्काळ धावपळ सुरू केली. सूत्रांच्या माहितीनुसार, प्रतापनगर झोपडपट्टीत राहणारा गुन्हेगारी वृत्तीचा एक अन् त्याचा दुसरा साथीदार या दोघांसह पीडित मुलींना ऑटोतून जाताना काही जणांनी बघितले. त्या सीताबर्डीत आल्या होत्या. येथून त्या कुठे गेल्या ते कळायला मार्ग नाही. बेपत्ता मुली आणि त्यांना फूस लावून पळविणाऱ्या आरोपींचा शोध घेतला जात असल्याची माहिती ठाणेदार दिनकर ठोसरे यांनी लोकमतला दिली.
----