नागपूर : दर पौर्णिमेला आकाशात पूर्ण चंद्र दर्शन सहजशक्य परंतु या फाल्गनी पौर्णिमेला एकाचवेळी पूर्व व पश्चिम आकाशात प्रत्येकी एक याप्रमाणे दोन पूर्ण चंद्र दर्शनाची संधी उपलब्ध आहे. हा दुसरा चंद्र म्हणजे शुक्र ग्रह असून दुर्बिनीने त्याच्या विहंगम कला बघायला मिळतील. दरम्यान चंद्रग्रहणाची पर्वणीही मंगळवारी हाेळीच्या धुलीवंदनाच्या दिवशी काही वेळासाठी पहायला मिळणार आहे. या दू्र्लभ घटनेचे साक्षीदार होण्याचे आवाहन विश्वभारती विज्ञान केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे.
चांद्रमासातील शेवटच्या फाल्गुनी पौर्णिमेला चंद्र सिंह राशीत असून पृथ्वीच्या सावलीत आल्याने आपणास ग्रहणावस्थेतच चंद्रोदय होतांना दिसेल. हे या वर्षातील आपल्या भागात दिसणारे पहिले व शेवटचे ग्रहण असेल. दुपारी ३.२० वाजता पृथ्वीच्या सावलीत येऊन चंद्रग्रहणाला सुरुवात हाेईल. मात्र सूर्यामुळे ते आपल्याला पाहता येणार नाही. मात्र सायंकाळी ६.२७ वाजता ग्रहण अगदी शेवटच्या टप्प्यात असताना चंद्राचा उदय हाेईल. ग्रहण सुटताना नागपूरसह विदर्भात १५ ते ३० मिनिटांपर्यंत ते नागरिकांना पाहता येणार आहे. सूमारे साडेतीन तास दिर्घ कालावधी असलेल्या या ग्रस्तोदित खंडग्रास चंद्रग्रहणाचा लाभ केवळ २५ मिनिटे घेता येईल.
पूर्व क्षितिजावरील हा आकाश नजारा पाहताना पश्चिम आकाशात सूर्यमालेतील सर्वात तेजस्वी असलेला शूक्र ग्रहाची आपल्या चंद्राच्या पौर्णिमेसारखी पूर्ण स्थिती सध्या स्थितीत मीन राशीत बघता येईल. याचा अर्थ पूर्व आकाशात चंद्र आणि पश्चिम आकाशात शूक्र पौर्णिमेच्या पूर्ण स्थितीत पाहता येतील. बुध व शुक्र ग्रह हे सूर्य आणि पृथ्वीच्या मध्ये आहेत. म्हणजेच शूक्र हा अंतर्ग्रह असल्याने या व बुध ग्रहाच्या आपल्या चंद्राप्रमाणे प्रतिपदा ते अमावस्या/पौर्णिमा अशा सर्व कला वेगवेगळ्या वेळी आकाशात बघता येतात, या कलांचे दर्शन दूर्बीणीतून अगदी स्पष्टपणे घेता येते. या कला मंगळवारपासूनच सुरू हाेत आहेत. पहिल्या दिवशी चंद्राप्रमाणे पूर्ण व पुढे कमी कमी हाेताना शुक्र ग्रहाला पाहता येईल.
"चंद्र किंवा सूर्यग्रहण या खेगाेलीय घडामाेडी आहेत, ज्याचा प्रभाव फार तर भरती-ओहटीच्या रुपात निसर्गावर दिसून येताे. मानवी जीवनावर त्याचा कुठलाही परिणाम हाेत नाही. त्यामुळे नागरिकांनी त्यांचे सण-उत्सव अगदी बनधाेकपणे साजरे करावे व या सुंदर दृश्याचे अवलाेकन करावे."- प्रभाकर दोड, खगाेलतज्ज्ञ
Web Summary : This Holi, witness a rare celestial event! See Venus as a 'second moon' in the west, plus a partial lunar eclipse visible during moonrise. Don't miss this unique sky show!
Web Summary : इस होली पर एक दुर्लभ खगोलीय घटना देखें! पश्चिम में शुक्र को 'दूसरे चंद्रमा' के रूप में देखें, साथ ही चंद्रोदय के दौरान आंशिक चंद्र ग्रहण भी दिखाई देगा। इस अनूठे खगोलीय शो को न चूकें!