शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

दोन डॉक्टरांना पकडले

By admin | Updated: August 6, 2016 02:41 IST

वाहन परवानासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अर्जदाराची तपासणी तर नाहीच, उलट कुणाचेही

परिवहन आयुक्तांचे चौकशीचे आदेश : परिवहन मंत्र्यांचे बोगस वैद्यकीय प्रमाणपत्र सुमेध वाघमारे/विशाल महाकाळकर ल्ल नागपूर वाहन परवानासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय प्रमाणपत्रासाठी अर्जदाराची तपासणी तर नाहीच, उलट कुणाचेही नाव व फोटो दिल्यास काही मिनिटातच वैद्यकीय प्रमाणपत्र दिले जाते. हे प्रमाणपत्र नागपूरच्या शहर व ग्रामीण प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या (आरटीओ) मुख्य द्वाराजवळील टपरीवर मिळते. रस्त्यावर धावणाऱ्या लाखो लोकांचा जीव हाती असणारा चालक सक्षम असल्याचा दाखला देण्याची ही पद्धत जीवघेणी ठरत असल्याचे वृत्त ‘लोकमत’ने प्रसिद्ध करताच खळबळ उडाली. स्वत: परिवहन आयुक्तांनी यासंदर्भात चौकशीचे आदेश दिले. याला घेऊन शहर आरटीओ कार्यालयाने पोलिसांकडे तक्रार करताच शुक्रवारी दोन तथाकथित डॉक्टरांना पकडले. वयाची चाळिशी गाठलेल्यांना किंवा आंतरराष्ट्रीय वाहन परवाना काढताना किंवा वाहन परवानाचे नूतनीकरण करताना चालक हा शारीरिकदृष्ट्या सुदृढ असावा, असा नियम आहे. हे सिद्ध करण्यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र आवश्यक असते. अर्जदार चालक हा अपंग तर नाही ना, याची तपासणी करीत त्याच्या डोळ्यांची आणि कानाची तपासणी प्राधान्याने करावी लागते. मात्र आरटीओसमोरील या डॉक्टरांकडे आवश्यक कोणतेही साधन नाही. कान, डोळे तपासणीतील तज्ज्ञ ही तर फार दूरची गोष्ट आहे. यातही हे डॉक्टरच आहेत का, यावरही शंका आहे. याला घेऊनच गुरुवारी ‘लोकमत’ चमूने स्टिंग आॅपरेशन केले. परिवहन मंत्री दिवाकर रावते यांच्या नावाने ‘फॉर्म १-ए’ हा अर्ज भरून शहर आरटीओ कार्यालयाच्या परिसरात बसणाऱ्या दोन तथाकथित डॉक्टरांना व ग्रामीण आरटीओ कार्यालयातील एका दलालाला दिला. त्यांनी कुठलेही आढेवेढे न घेता पैसे घेत काही मिनिटात प्रमाणपत्र दिले.