शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
2
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
3
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
4
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
5
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
6
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
7
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
8
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
9
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
10
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
11
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
12
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
13
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
14
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
15
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
16
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
17
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
18
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
19
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
20
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

मतदानाला दोन दिवस बाकी अन नागपूर जिल्ह्यात दोन कारमधून ९ लाख रुपयांची जप्ती

By योगेश पांडे | Updated: April 17, 2024 23:06 IST

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे पथक मांढळ-कुही मार्गावरील वग टी-पाॅइंटजवळ वाहनांची तपासणी करीत हाेते.

लाेकमत न्यूज नेटवर्कमांढळ : निवडणूक विभागाने जिल्ह्यात दोन वेगवेगळ्या कारवायांमध्ये दोन कारमधून ९ लाख रुपयांची रोकड जप्त केली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीतील काटोल मार्ग व कुही पाेलिस ठाण्याच्या हद्दीतील मांढळ-कुही राेडवरील वग (ता. कुही) टी-पाॅइंटजवळ या दोन्ही कारवाया करण्यात आला.

लाेकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक विभागाचे पथक मांढळ-कुही मार्गावरील वग टी-पाॅइंटजवळ वाहनांची तपासणी करीत हाेते. या पथकाने कार (क्रमांक एमएच-४०, बीजे-१२६२) थांबविली व झडती घेतली. त्यांना कारमधील बॅगमध्ये ६ लाख ६० हजार ७४१ रुपयांची राेख आढळून आली. ही रक्कम कैलास टिकमदास गोविंदानी (रा. उमरेड) यांच्या मालकीची असल्याचे कारचालक महेंद्र रोहिदास राठोड आणि त्याचा सहकारी मनोज बळीराम चव्हाण यांनी अधिकाऱ्यांना सांगितले. कैलास गाेविंदानी यांना सूचना देऊनही त्यांनी या रकमेबाबत काेणतीही कागदपत्रे सादर केली नाही. त्यामुळे अधिकाऱ्यांनी संपूर्ण प्रक्रिया पूर्ण केली आणि ती रक्कम जप्त करून कुही पाेलिसांच्या ताब्यात दिली. शिवाय, कैलास गाेविंदानी यांना जिल्हा गाऱ्हाणी समितीकडे दाद मागण्याची सूचना केली. ही कारवाई निवडणूक विभागाचे संदीप वडापळे यांच्या नेतृत्वातील पथकाने केली. मतदान दाेन दिवसांवर असल्याने या रकमेबाबत संशय बळावला आहे.

काटोल मार्गावरदेखील जप्तीनागपूर शहरातील गिट्टीखदान पोलीस स्टेशन अंतर्गत नवीन काटोल नाक्यावर बुधवारी सायंकाळी ५.३० वाजताच्या सुमारास निवडणूक आयोगाच्या पथकाने एका कारला थांबविले. त्यात झडती घेतली असता २.२१ लाख रुपयांची रोकड आढळून आली. कारमधील वाडीतील व्यक्तीला या रोख रकमेबाबत समाधानकारक उत्तर देता आले नाही. त्यात निवडणूकीशी संबंधित पत्रकेदेखील असल्याची माहिती सूत्रांनी दिली. गिट्टीखदान पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक विनोद कालेकर यांना विचारणा केली असता त्यांनी रक्कम जप्त झाल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला. मात्र कारवाई निवडणूक विभागाच्या पथकाने केल्याने अधिक तपशील नसल्याचे स्पष्ट केले.

टॅग्स :nagpurनागपूर