शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात एकाच दिवशी दोन सायबर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2018 15:22 IST

तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत नागपुरातील तिघांच्या खात्यातून एका आरोपीने दोन लाखांची रोकड काढून घेतली. सायबर गुन्हेगाराने अवघ्या चार मिनिटात ही हातचलाखी केली. या प्रकरणात बुधवारी सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.

ठळक मुद्देतिघांची फसवणूक, दोन लाखांचा गंडा

सीताबर्डीत गुन्हा दाखललोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : तंत्रज्ञानाचा गैरवापर करीत नागपुरातील तिघांच्या खात्यातून एका आरोपीने दोन लाखांची रोकड काढून घेतली. सायबर गुन्हेगाराने अवघ्या चार मिनिटात ही हातचलाखी केली. या प्रकरणात बुधवारी सीताबर्डी पोलिसांनी दोन वेगवेगळे गुन्हे दाखल केले.मोमिनपु-यातील कमाल बाबा दर्गाहच्या मागे राहणारे अब्दुल रशिद अब्दुल हफिज कुरेशी (वय ६५) यांच्या तसेच सुनंदा नांदुरकर यांच्या खात्यातून ४ मे च्या रात्री ११. ५४ च्या सुमारास सायबर गुन्हेगाराने १ लाख, २३ हजार, ४०० रुपये काढून घेतले. भोले पेट्रोल पंपाजवळच्या एटीएममधून आरोपीने ही रक्कम लंपास केली.या गैरप्रकाराच्या चार मिनिटांनंतर, ११ वाजून ५८ मिनिटांनी वाठोड्यातील स्वामी नारायण मंदीराजवळ राहणारे सोहनलाल सुग्रीव गौतम (वय २०) यांच्या खात्यातून अशाच प्रकारे ७८ हजार, ५०० रुपये काढून घेतले. ही रक्कम देखिल भोले पेट्रोल पंपाजवळच्या एटीएममधूनच काढण्यात आली. हे दोन्ही गैरप्रकार तब्बल ४ महिन्यानंतर उघडकीस आले.दोन्ही गुन्ह्यातील आरोपी एकचविशेष म्हणजे, तीनही पीडित व्यक्ती यावेळी स्वत:च्या घरी होते आणि त्यांचे कार्डही त्यांच्याचजवळ होते. तरीसुद्धा आरोपीने ही रक्कम लंपास केली. अवघ्या चार मिनिटात एकाच एटीएममध्ये हा गैरप्रकार घडला. त्यामुळे एकाच आरोपीचे हे कृत्य असावे, असा अंदाज आहे. बुधवारी या प्रकरणी रशिद आणि गौतम या दोघाच्या वेगवेगळ्या तक्रारी नोंदवून घेत सीताबर्डी पोलिसांनी गुन्हा दाखल केला. आरोपीचा शोध घेतला जात आहे.

टॅग्स :cyber crimeसायबर क्राइम