शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

दोन कोटींनी फसवणूक

By admin | Updated: September 14, 2015 03:07 IST

बहुचर्चित कंपनीत ५१ टक्क्यांची भागीदारी देण्याची बतावणी करून पुण्यातील एका दाम्पत्याला नागपूरकर कंपनी संचालकाने २ कोटींचा गंडा घातला.

नागपूर : बहुचर्चित कंपनीत ५१ टक्क्यांची भागीदारी देण्याची बतावणी करून पुण्यातील एका दाम्पत्याला नागपूरकर कंपनी संचालकाने २ कोटींचा गंडा घातला. गेल्या ५ वर्षांपासून सुरू असलेल्या या व्यवहारात फसवणूक झाल्याची भावना झाल्यामुळे पीडित व्यक्तीने सदर पोलिसांकडे तक्रार नोंदवली.चेतन जयंतीलाल शहा (वय ४५) असे तक्रारकर्त्या व्यक्तीचे नाव असून, ते पुण्यातील एमएस मार्गावर राहतात. त्यांची पत्नी शेपाली या ब्युटीशियन आहेत. तर, चेतन विदेशात नोकरीला असल्याचे पोलीस सांगतात. शहा दाम्पत्यांची २०११ मध्ये बहुचर्चित लेगाटो हेअर अ‍ॅन्ड स्कीन इंटरनॅशनल प्रा. लि. नागपूरचे संचालक अनिल वामनराव आदमने यांच्याशी भेट झाली. आदमने आशीर्वाद एनआयटी कॉलनी, विश्वकर्मानगरात राहातात. शहा दाम्पत्यांचा आदमनेशी पुढे संपर्क वाढला. परस्परांवरील विश्वास वाढल्यानंतर आदमनेंनी सदरमधील पूनम चेंबर्समध्ये लेगाटोचे मुख्यालय असून, या कंपनीच्या मोठमोठ्या हॉटेल, मॉलमध्ये ठिकठिकाणी शाखा आहेत. लेगाटोत शेपाली यांच्या नावाने ५१ टक्क्यांची भागीदारी देऊन व्यवसाय करण्याचा प्रस्ताव आदमनेंनी दिला. त्याबदल्यात त्याने शहा दाम्पत्याकडून २ कोटी ५ लाख रुपये घेतले. २९ जून २०११ ते सप्टेंबर २०१५ या पाच वर्षांच्या कालावधीत प्रत्यक्षात आदमनेने लेगाटोत ठरल्याप्रमाणे शेपाली यांना ५१ टक्यांची भागीदारी दिली नाही. यामुळे आदमने आणि शहा दाम्पत्यात वाद झाला. त्याने फसवणूक केल्याचे लक्षात आल्यामुळे शनिवारी शहा यांनी सदर ठाण्यात तक्रार नोंदवली. पोलिसांनी शहानिशा केल्यानंतर लेगाटो हेअर अ‍ॅण्ड स्किन इन्टरनॅशनल प्रा. ली. नागपूर तसेच अनिल वामनराव आदमनेविरुध्द कलम ४०९, ४२०, ४०६, ३४ अन्वये गुन्हे दाखल केले. आरोपीला अटक झाली की नाही, ते वृत्त लिहिस्तोवर स्पष्ट होऊ शकले नाही. (प्रतिनिधी)