शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
5
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
6
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
7
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
8
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
9
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
10
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
11
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
12
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
13
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
14
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
15
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
16
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
17
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
18
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
19
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
20
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात चीनमधून परतलेले दोन कोरोना संशयित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2020 00:20 IST

उपराजधानीत कोरोना संशयितत रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मेडिकलमध्ये आधीपासून एक संशयित रुग्ण उपचार घेत असताना बुधवारी आणखी दोन संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले.

लोकमत  न्यूज  नेटवर्क नागपूर: उपराजधानीत कोरोना संशयितत रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे. मेडिकलमध्ये आधीपासून एक संशयित रुग्ण उपचार घेत असताना बुधवारी आणखी दोन संशयित रुग्णांना दाखल करण्यात आले. यात २३ वर्षीय तरुणी असून दुसरा ४२ वर्षीय पुरुष आहे.संशयित रुग्णांत २३ वर्षीय तरुणी ही नागपूरच्या दिघोरी येथील रहिवासी आहे. चीनमध्ये एमबीबीएसचे शिक्षण घेत आहे. काही दिवसांपूर्वीच ती चीन येथून नागपुरात आली. दोन दिवसांपासून तिला सर्दी, खोकल्याचा त्रास सुरू झाला. यामुळे बुधवारी दुपारी १.१५ वाजता मेडिकलच्या वॉर्ड क्र. २५ मध्ये दाखल करण्यात आले. तर दुसरा संशयित रुग्ण औरंगाबाद येथील आहे. चीनमध्ये व्यावसायिक कामासाठी गेला होता. नागपुरात आला असताना लक्षणे आढळून आली. यामुळे त्यालाही दाखल करून घेण्यात आले. दोन्ही रुग्णांचे नमुने इंदिरा गांधी शासकीय वैद्याकीय महाविद्याालय व रुग्णालयाकडे (मेयो)पाठवण्यात आले आहे. विशेष म्हणजे तीन दिवसांपूर्वी थायलंड येथून परतलेल्या एका कोरोना विषाणू संशयित रुग्णाला मेडिकलमध्ये दाखल करण्यात आले होते. त्याचे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत पाठविले होते. परंतु तीन दिवस होऊन अद्यााप अहवाल प्राप्त झाला नाही. सध्या या तिन्ही रुग्णांची प्रकती स्थिर असून त्यांच्या लक्षणावर उपचार केले जात असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. संशयित रुग्णांची वाढती संख्या पाहता आरोग्य विभागात खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे, ज्या वॉर्ड क्र. २५ मध्ये संशयित रुग्णाला ठेवले जात आहे. तिथे मेडिसीन विभागाच्या सामान्य रुग्ण भरती आहे. त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक आहे. संशयित रुग्णांचे उशिरा होत असलेले निदान आणि यात कोणी पॉझिटिव्ह आल्यास मोठा धोका होण्याची शक्यता आहे.

टॅग्स :corona virusकोरोनाGovernment Medical College, Nagpurशासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय