शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
4
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
5
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
6
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
7
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
8
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
9
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
10
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
11
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!

आमदाराच्या नावाने २५ लाखांची लाच घेताना दोघांना अटक; राजकीय वर्तुळात खळबळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 28, 2023 21:53 IST

Nagpur News विधानपरिषदेतील आ.वजाहत मिर्झा यांच्या नावाने २५ लाखांची लाच घेताना दोघांना नागपुरात रंगेहाथ अटक करण्यात आली आहे.

योगेश पांडे नागपूर : विधानपरिषदेतील आ.वजाहत मिर्झा यांच्या नावाने २५ लाखांची लाच घेताना दोघांना नागपुरात रंगेहाथ अटक करण्यात आली आहे. विधीमंडळात प्रश्न उपस्थित न करण्यासाठी दोघांनी एका शासकीय अधिकाऱ्याला एक कोटींची लाच मागितली होती. लाच घेताना पकडण्यात आलेला एक आरोपी एमआयडीसीमध्ये तंत्रज्ञ असून दुसरा राजकीय कार्यकर्ता आहे. तक्रारदार अधिकारी ‘आरटीओ’तील असल्याची माहिती सूत्रांनी दिली असून या कारवाईमुळे राजकीय वर्तुळातदेखील खळबळ माजली असून विविध प्रश्न उपस्थित होत आहेत.

संबंधित अधिकाऱ्याविरोधात त्यांच्यात विभागातील महिला अधिकाऱ्याने तक्रार केली आहे. यासंदर्भात आ.वजाहत मिर्झा यांनी विधानपरिषदेत प्रश्न उपस्थित केला होता. मात्र हाच मुद्दा पकडून एमआयडीसी-अमरावती येथील टेक्निशिअन दिलीप वामनराव खोडे (५०, हिरानंदानी मिडोज, ठाणे पश्चिम) व शेखर भोयर (अमरावती) या दोघांनी तक्रारदार अधिकाऱ्याला संपर्क केला. आपण आ.मिर्झा यांच्या जवळचे असून विधानपरिषदेत यापुढे हा प्रश्न उपस्थित होणार नाही व तक्रारीवर कुठलीही कारवाई न होता मुद्दा परस्पर मिटविल्या जाईल, अशी बतावणी करत दोन्ही प्रकरणांचे प्रत्येकी ५० लाख असे एकूण १ कोटी रुपये मागितले. ही रक्कम फार जास्त होत असल्याचे म्हणत अधिकाऱ्याने हात वर केले. मात्र दोन्ही आरोपींनी २५ लाख रुपयांत प्रकरण निपटविण्याची तयारी दाखविली. लाच देण्याची इच्छा नसल्याने संबंधित अधिकाऱ्याने लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली.

विभागातील अधिकाऱ्यांनी या तक्रारीची प्राथमिक चाचपणी केली व त्यानंतर कारवाईची तयारी केली. ठरल्यानुसार अधिकारी २५ लाख रुपये घेऊन मंगळवारी सायंकाळी रविभवन येथे गेले. तेथे लाच स्वीकारत असताना दोन्ही आरोपींना दबा धरून बसलेल्या पथकाने रंगेहाथ पकडले. आपण अडकलो असल्याचे लक्षात येताच दोन्ही आरोपींनी आ.वजाहत मिर्झा यांचे नाव घेण्यास सुरुवात केली. दोन्ही आरोपींविरोधात भ्रष्टाचार प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणात आ.मिर्झा यांचे नाव का घेण्यात आले याबाबत दोघांचीही चौकशी करण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. पोलीस निरीक्षक सचिन मते, निलेश उरकुडे, प्रीती शेंडे, सुशील यादव, हरीश गांजरे, बादल मांढरे, सूरज भोंगाडे, विनोद नायगमकर यांच्या पथकाने ही कारवाई केली. 

प्रसारमाध्यमांतूनच कारवाईची माहिती, माझा संबंध नाही : मिर्झायासंदर्भात वजाहत मिर्झा यांना संपर्क केला असता त्यांनी या कारवाईची माहिती प्रसारमाध्यमांकडूनच मिळाल्याचे सांगितले. मला प्रसारमाध्यमांकडूनच हा प्रकार कळाला आहे. माझे या प्रकरणात काहीच घेणेदेणे नाही. दोन्ही आरोपींशी माझा काहीच संबंध नाही. माझ्याकडे विविध प्रश्न उपस्थित करण्याची मागणी करत अनेक सामान्य लोक येतात. त्यातील योग्य प्रश्न मी विधानपरिषदेत उपस्थित करतो. तर कधी आवश्यक पत्र देतो. संबंधित मुद्दा तर मीच विधीमंडळात उपस्थित केला होता. माझ्या नावाचा गैरवापर करून हा प्रकार करण्यात आला आहे, असा दावा मिर्झा यांनी केला.

टॅग्स :Bribe Caseलाच प्रकरणCrime Newsगुन्हेगारी