शहरं
Join us  
Trending Stories
1
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
2
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
3
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
4
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
5
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
6
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
7
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
8
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
9
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
10
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
11
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
12
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
13
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
14
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
15
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
16
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
17
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
18
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
19
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
20
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात धुलिवंदनात रंग व गुलालाची दोन कोटींची उलाढाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 1, 2018 00:08 IST

इतवारी, रेशीमओळ या विदर्भाच्या मुख्य बाजारपेठेतून गेल्या काही वर्षांपासून धुलिवंदनात लाल आणि हिरव्या रासायनिक रंगाऐवजी विविधरंगी गुलाल आणि हर्बल रंगाची जास्त विक्री होते. यावर्षी रंग आणि गुलालाची दोन कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.

ठळक मुद्दे नागपूर विदर्भाची मुख्य बाजारपेठ : धोकादायक रंग टाळा

लोकमत न्यूज नेटवर्क नागपूर : इतवारी, रेशीमओळ या विदर्भाच्या मुख्य बाजारपेठेतून गेल्या काही वर्षांपासून धुलिवंदनात लाल आणि हिरव्या रासायनिक रंगाऐवजी विविधरंगी गुलाल आणि हर्बल रंगाची जास्त विक्री होते. यावर्षी रंग आणि गुलालाची दोन कोटींपेक्षा जास्तीची उलाढाल होणार असल्याची माहिती व्यापाऱ्यांनी दिली.३० टन रंगाची विक्रीहोळीदरम्यान गुजरात आणि मुंबईहून उच्च दर्जाचे रंग रेशीमओळ येथील ठोक व्यापाऱ्यांकडे येतात. त्यांच्याकडून किरकोळ व्यापारी रंगाची खरेदी करतात. या रंगामध्ये भेसळ करून हलक्या दर्जाचे रंग बाजारात विक्रीसाठी आणतात. गुजरात आणि मुंबईहून १० टन रंग येत असेल तर किरकोळ व्यापारी या रंगापासून ३० टन हलका माल तयार करतात. गेल्या काही दिवसांपासून रोडामॅन या उच्च दर्जाच्या लाल रंगाचे भाव दुपटीवर अर्थात हजार रुपये किलोपर्यंत पोहोचले आहेत. चीन येथून कच्चा माल काही दिवसांपासून फारच कमी येत आहे. रोडामॅनचा ८० टक्के उपयोग लाल गुलाल तयार करण्यासाठी होतो. विविध रंगातील गुलाल २५ किलोच्या बॅगमध्ये १२०० ते १३०० रुपये किलो अर्थात ५० ते ६० रुपये किलो या भावात विक्रीस आहेत. उच्च दर्जाचे रंग आणि नागपुरी गुलालाची विक्री मध्यप्रदेश, छत्तीसगड आणि विदर्भाच्या सर्वच जिल्ह्यात होते. एकूण ५० ते ६० लाख रुपये किमतीचा गुलाल विकला जातो. नागपुरात रंग आणि गुलालाची विक्री २ कोटींपेक्षा जास्त असल्याची माहिती रेशीमओळ येथील ठक्कर ब्रदर्सचे संचालक प्रकाशभाई ठक्कर यांनी लोकमतशी बोलताना दिली.नागपुरात गुलाल व हर्बल रंगांना पसंतीरासायनिक रंग त्वचेसाठी घातक असल्यामुळे गेल्या काही वर्षांपासून नागपुरातील सजग नागरिक गडद हिरवा आणि लाल रंगाऐवजी गुलाल आणि हर्बल रंगांना जास्त पसंती देतात. महिला आणि वयस्कांना हर्बल रंग जास्त आवडतो. हर्बल रंगाची विक्री लाखांच्या घरात गेली आहे. हा रंग आकर्षक पॅकिंगमध्ये बाजारात उपलब्ध असल्याचे प्रकाशभाई यांनी सांगितले.चीन मोठी बाजारपेठसर्वत्र वापरला जाणारा रोडामॅन या लाल रंगाच्या निर्मितीसाठी सर्वाधिक कच्चा माल चीनमधून गुजरात आणि मुंबईत येतो. काही वर्षांपासून तर चीन पक्का रोडामॅन भारतात पाठवित आहे. या रासायनिक रंगाची उलाढाल कोट्यवधींच्या घरात आहे. कापड उद्योगात या रंगाचा जास्त उपयोग होतो. हा रंग महाग असल्यामुळे होळीदरम्यान नागपुरात या रंगाची विक्री सव्वा कोटीच्या आसपास होते.

टॅग्स :Holi 2018होळी २०१८nagpurनागपूर