नरखेड : तालुक्यातील तूर खरेदी केंद्राचा शुभारंभ झाला आहे. या खरेदी केंद्रावर किमान आधारभूत किमतीप्रमाणे तुरीची खरेदी केली जाणार आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्याच्याकडील तुरीची विक्री करण्यासाठी ऑनलाईन नोंदणी करावी, असे आवाहन नरखेड शेतकी खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष लीलाधर ठाकरे, व्यवस्थापक हरिभाऊ ठाकरे यांनी केले आहे. शासनाने तुरीची किमान आधारभूत किंमत प्रति क्विंटल सहा हजार रुपये जाहीर केली आहे. नरखेड तालुका शेतकी खरेदी-विक्री संघ व जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या निर्देशानुसार तूर खरेदी सुरू करण्यात आली आहे. तूर विक्रीसाठी ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया २२ डिसेंबरपासून सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी संबंधित शेतकऱ्यांचा तूरपेरा असलेला सातबारा, आधारकार्ड, बँक पासबुकची झेरॉक्स व मोबाईल क्रमांक असणे आवश्यक आहे.
तूर खरेदीला सुरुवात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:42 IST