शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
4
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
5
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
6
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
7
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
8
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
9
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
10
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
11
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
12
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
13
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
14
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
15
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
16
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
17
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
18
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
19
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
20
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
Daily Top 2Weekly Top 5

तुम मुझे यू भुला ना पाओंगे...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 27, 2019 23:53 IST

आवाजाचा जादूगर ज्याच्या गीतांनी संगीताच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावले, असे प्रसिद्ध पार्श्वगायक मो. रफी यांच्या आठवणीत ‘डायमंड फॉरेव्हर मोहम्मद रफी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून नागपुरातील प्रसिद्ध गायकांनी रफींच्या गीतांची सुरेल माळ कार्यक्रमातून ओवली. भावनांना स्पर्श करणारी त्यांची गीते रसिकांच्याही ओठांवर सहजतेने उमलली. आजही आवाजाच्या या जादूगाराच्या आठवणीत सादर झालेल्या या श्रवणीय कार्यक्रमातून हीच दाद मिळाली तुम मुझे यू भूला ना पाओंगे...

ठळक मुद्देमो. रफी यांच्या गीतांचा श्रवणीय नजराणा

लोकमत  न्यूज  नेटवर्कनागपूर : आवाजाचा जादूगर ज्याच्या गीतांनी संगीताच्या चाहत्यांना अक्षरश: वेड लावले, असे प्रसिद्ध पार्श्वगायक मो. रफी यांच्या आठवणीत ‘डायमंड फॉरेव्हर मोहम्मद रफी’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमातून नागपुरातील प्रसिद्ध गायकांनी रफींच्या गीतांची सुरेल माळ कार्यक्रमातून ओवली. भावनांना स्पर्श करणारी त्यांची गीते रसिकांच्याही ओठांवर सहजतेने उमलली. आजही आवाजाच्या या जादूगाराच्या आठवणीत सादर झालेल्या या श्रवणीय कार्यक्रमातून हीच दाद मिळाली तुम मुझे यू भूला ना पाओंगे...श्री सिद्धिविनायक पब्लिसिटीद्वारे आयोजित या कार्यक्रमाचे सादरीकरण सायंटिफिक सभागृहात करण्यात आले होते. समीर पंडित यांच्या संकल्पनेतून सादर करण्यात आलेल्या या कार्यक्रमात गायक सागर मधुमटके, सारंग जोशी, विजय चिवंडे, श्रद्धा जोशी, श्रेया खराबे आणि सोनाली दीक्षित यांनी रफींची सदाबहार गीते सादर कली. कार्यक्रमाची सुरुवात सारंग जोशी यांनी मेरी आवाज सुनो... या गीताने केली. त्यानंतर चौदहवी का चाँद..., मै कही कवी ना बन जाऊ..., नजर ना लग जाये..., दर्दे दिल दर्दे जिगर... यासारखी बहारदार गीते गायकांनी सादर केली. या गीतांबरोबरच मो. रफी यांच्या जीवनाचा प्रवास निवेदनाच्या माध्यमातून डॉ. मनोज साल्पेकर यांनी उलगडला. रिमझिम पावसांच्या बरसणाऱ्या सरींनी गार झालेल्या वातावरणात तुम ने मुझे देखा..., हुवी श्याम उनका खयाल आ गया..., आशा ओ के सावन मे... यासारख्या श्रवणीय गीतांनी चांगलीच रंगत भरली. बेखुदी में सनम..., ना जा कहीं अब न जा..., एहसान तेरा हो गा मुझपे... सारख्या विरहाच्या भावना छेडणाऱ्या गीतांनाही रसिकांनी दाद दिली. या कार्यक्रमातून जवळपास २६ गीतांचे सादरीकरण करण्यात आले. कार्यक्रमात वाद्यांवर राजा राठोड, मंगेश, ऋग्वेद पांडे, प्रशांत नागमोते, नंदू गोहोणे, अशोक टोकोलवार यांनी उत्कृष्ट साथसंगत केली.

टॅग्स :Mohammed Rafiमोहम्मद रफीmusicसंगीतScientific Hall, Nagpurसायंटिफिक सभागृह