शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

भालचंद्र अंधारे यांना तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 3, 2018 11:25 IST

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९५ वा वर्धापनदिन ४ आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी इतिहास संशोधक डॉ.भालचंद्र रामचंद्र अंधारे यांचा विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देनागपूर विद्यापीठाची घोषणा४ आॅगस्ट रोजी ९५ व्या वर्धापनदिन सोहळ्याचे आयोजन

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचा ९५ वा वर्धापनदिन ४ आॅगस्ट रोजी साजरा करण्यात येणार आहे. याप्रसंगी इतिहास संशोधक डॉ.भालचंद्र रामचंद्र अंधारे यांचा विद्यापीठातर्फे राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्काराने सन्मान करण्यात येणार आहे.अंबाझरी मार्गावरील गुरुनानक भवन येथे सकाळी १० वाजता हा कार्यक्रम होईल. यावेळी अहमदाबाद येथील गुजरात टेक्नॉलॉजिकल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.एन.आर.शेठ हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहतील. तर अध्यक्षस्थानी नागपूर विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.सिद्धार्थविनायक काणे हे असतील. तर प्र-कुलगुरू डॉ.प्रमोद येवले यांची प्रमुख उपस्थिती असेल. याप्रसंगी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कार तसेच इतर पुरस्कारांचे वितरण करण्यात येणार आहे.विद्यापीठाच्या ९५ व्या वर्धापनदिनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराज जीवनसाधना पुरस्कारासमवेतच आदर्श विद्यार्थी, अधिकारी व कर्मचाऱ्यांना पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहेत. या पुरस्कारांची कुलगुरू डॉ.काणे यांनी गुरुवारी घोषणा केली.

लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ ८४ अर्जचएरवी कुठलेही सन्मान किंवा पुरस्कार मिळाला की विद्यार्थ्यांना चांगले काम करण्याची प्रेरणा व नवा उत्साह मिळतो. परंतु राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात नेमके विरुद्ध चित्र पहायला मिळत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदादेखील विद्यापीठाने शैक्षणिक व अभ्यासेतर विविध उपक्रमात भरीव कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांकडून अर्ज मागविले होते. याकरिता महाविद्यालयांना पत्रदेखील पाठविण्यात आले होते व विद्यार्थ्यांना याची माहिती देण्याची सूचना करण्यात आली होती. परंतु प्रत्यक्षात लाखो विद्यार्थ्यांपैकी केवळ ८४ विद्यार्थ्यांचेच अर्ज आले. यात २५ मुले व ५९ मुलींचा समावेश आहे. २०१६ साली हाच आकडा १३३ इतका होता. इतक्या कमी प्रमाणात अर्ज येण्यामागे महाविद्यालये व विद्यार्थ्यांची अनास्था आहे की विद्यापीठ प्रशासनालाच विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती पोहोचविण्यात अपयश आले असा प्रश्न निर्माण झाला आहे.

टॅग्स :Rashtrasant Tukdoji Maharaj Nagpur Universityराष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ