शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
2
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
3
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
4
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
5
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
6
एका मॅचसाठी मिळतात फक्त ७५० रुपये; बांगलादेशी खेळाडूची व्यथा ऐकून बीसीबी प्रमुख झाले शॉक!
7
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
8
"दहशतवादी संघटनेशी संबंध”; कुटुंब ९ तास डिजिटल अरेस्टमध्ये; मुलाच्या हुशारीने वाचले ६ लाख
9
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
10
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
11
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
12
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
13
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
14
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
15
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
16
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
17
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
18
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
19
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
20
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे नागपूर मनपाचे नवे आयुक्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 21, 2020 23:19 IST

शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : शिस्तप्रिय, कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणून ओळखले जाणारे प्रशासकीय अधिकारी तुकाराम मुंढे यांची नागपूर महापालिकेच्या आयुक्तपदी बदली करण्यात आली आहे. राज्य सरकारने मंगळवारी २२ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यात तुकाराम मुंढे यांचा समावेश आहे. मागील काही दिवसापासून मुंढे महापालिका आयुक्त म्हणून येणार असल्याची चर्चा होती.तुकाराम मुंढे हे या आधी एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर कार्यरत होते. तत्कालीन फडणवीस सरकारने त्यांची एड्स नियंत्रण प्रकल्पाच्या संचालकपदावर नियुक्ती केली होती. मुंढे यांची महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भागांमध्ये बदली झाली असून, त्यांनी प्रत्येक ठिकाणी आपल्या कामाची छाप उमटवली आहे. नियमबाह्य, अनधिकृत बांधकामांना अभय देण्याच्या मुद्यावरून त्यांचा नेहमीच राजकारण्यांबरोबर संघर्ष झाला आहे. राजकारण्यांच्या दबावापुढे न झुकता नियमानुसार काम करणे ही तुकाराम मुंढे यांची खासियत आहे. त्यामुळेच सर्वसामान्यांमध्ये ते लोकप्रिय आहेत. काही ठिकाणी तुकाराम मुंढे यांची बदली रोखण्यासाठी सर्वसामान्य जनतेने रस्त्यावर उतरुन आंदोलन केले आहे.बारा वर्षांच्या नोकरीत नऊ वेळा बदलली झाली आहे. बीडसारख्या दुष्काळी जिल्ह्यात ताडसौन्ना या गावी गरीब शेतकरी कुटुंबात तुकाराम मुंढे यांचा जन्म झाला. लहानपणी ते वडिलांसोबत आठवडी बाजारात भाजी विकण्यास जात. जिल्हा परिषद शाळेत शिकल्यानंतर अकरावी, बारावीला विज्ञान शाखेत प्रवेश घेतला. औरंगाबाद येथील शासकीय महाविद्यालयातून त्यांनी इतिहास, राज्यशास्त्र या विषयात पदवी प्राप्त केली. २००१ मध्ये त्यांनी एमपीएससी परीक्षा उत्तीर्ण केली. २००४ साली ते सेवेत रुजू झाले.त्यांनी नोकरीचा राजीनामा देऊ न २००५ मध्ये यूपीएससी परीक्षा दिली. यात देशात २० वे आले. त्यांची सेवेची सुरुवात सोलापूर येथून झाली.नंतर धारणी या आदिवासी भागात प्रकल्प अधिकारी म्हणून बदली झाली. ते नागपूर जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी होते. त्यांनी नाशिक, नवी मुंबई महापालिकेत त्यांनी उल्लेखनीय काम केले आहे.मुंढे यांच्या नेतृत्वात प्रशासन जोमाने काम करेल- जोशीमहाराष्ट्र शासनाने नागपूर महानगरपालिकेच्या आयुक्तपदी तुकाराम मुंढे यांची नियुक्ती केली. शासनाच्या या निर्णयाचे मी स्वागत करतो. विद्यमान आयुक्त अभिजित बांगर यांनी प्रशासकीय शिस्त लावून प्रत्येक क्षेत्रात आपल्या नेतृत्वाचा ठसा उमटविला. स्वच्छ सर्वेक्षणात उत्तम कामगिरी केली. यापुढे नवे आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या नेतृत्वात प्रशासन अधिक जोमाने काम करेल, आणि नागपूर शहराचा विकास गतीने होण्यास होईल, असा विश्वास महापौर संदीप जोशी यांनी व्यक्त केला.

टॅग्स :Nagpur Municipal Corporationनागपूर महानगर पालिकाtukaram mundheतुकाराम मुंढेcommissionerआयुक्त