शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

तुकाराम मुंढे; वाद पेटला; माफी मागा अन्यथा पोलिसात तक्रार करू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2020 13:06 IST

माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा भाजप महिला आघाडी व मनपाच्या महिला नगरसेविका त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करतील, असा इशारा दिला आहे.

ठळक मुद्देनागपुरातील भाजप महिला नगरसेविका संतप्त

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : काही महिलांनी कपडे फाडून आपले चारित्र्यहनन करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप माजी मनपा आयुक्त तुकाराम मुंढे यांनी केला आहे. यावर भाजपच्या महिला नगरसेविकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली असून मुंढे यांनी सार्वजनिक माफी मागावी, अन्यथा भाजप महिला आघाडी व मनपाच्या महिला नगरसेविका त्यांच्याविरुद्ध पोलिसात तक्रार दाखल करतील, असा इशारा दिला आहे.

भाजपचे वरिष्ठ नगरसेवक दयाशंकर तिवारी यांनी पत्रपरिषदेत सांगितले की, मुंढे यांच्यासोबत जी घटना घडली त्याची वेळ व स्थळ कोणते होते याची घोषणा करावी. किती महिलांनी कपडे फाडले त्यांची संख्याही सांगायला हवी. आयुक्तांना भेटणाऱ्या प्रत्येक व्यक्तीचे नाव रजिस्टरमध्ये नोंदवले जाते. त्यांची नावेही जाहीर करायला हवी. ते आयएएस अधिकारी आहेत. अशी घटना घडल्यावर त्यांनी तात्काळ गुन्हा दाखल करायला हवा होता. इतके दिवस ते गप्प का राहिले. त्यांचे आॅफिस व घरातही सीसीटीव्ही कॅमेरे लागले आहेत. त्यांनी त्याचे फुटेजही जारी करायला हवे. जर मुंढे हे सर्व पुरावे देण्यास अपयशी राहिले तर स्पष्ट होईल की, त्यांच्या वक्तव्याला कुठलाही आधार नाही. केवळ लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्यांनी हे सर्व केले असा आरोपही त्यांनी केला. त्यांच्या या वक्तव्यामुळे महिला जातीचेच चारित्र्यहनन झाले आहे. २४ तासात मुंढे यांनी पुरावे द्यावे अन्यथा भाजपच्या महिला आघाडी व महिला नगरसेवकांतर्फे तक्रार दाखल केली जाईल. यावेळी उपमहापौर मनिषा कोठे, प्रतोद दिव्या धुरडे, वर्षा ठाकरे, प्रगती पाटील आदी उपस्थित होते.

मग तेव्हा गप्प का राहिले मुंढेमनपाचे माजी आयुक्त तुकाराम मुंढे यांनी महिलांबाबत केलेले वक्तव्य निंदनीय आहे. ज्या घटनेचा उल्लेख मुंढे यांनी केला आहे, त्याचे नावही त्यांनी सांगावे, अन्यथा माफी मागावी. जर त्यांनी माफी मागितली नाही तर पोलिसात तक्रार दाखल करू. घटना घडली तेव्हा ते बोलले का नाही. इतके दिवस गप्प का राहिले. बदली झाल्यावरच का आठवले. मुंढे हे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी या घटनेची तात्काळ तक्रार करायला हवी होती. मुंढे यांचे हे वक्तव्य महिलांचा अपमान करणारे आहे.संदीप जोशी, महापौर

 

टॅग्स :tukaram mundheतुकाराम मुंढे