शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
2
होर्मुजच्या समुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
3
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
4
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
5
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
6
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
7
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
8
उन्हाच्या तडाख्यामुळे मुंबईकरांचा जलसाठा १० टक्क्यांनी घटला, आता ३७ टक्केच शिल्लक
9
११५ वर्षे जुना एल्फिन्स्टन पूल अखेर इतिहासजमा; महारेलच्या विलंबामुळे ब्लॉक दीड तासांनी लांबला
10
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
11
‘मेट्रो २ बी, मेट्रो ९’ला पुन्हा नवीन तारीख; आता मंगळवारपासून दोन्ही मार्गिका सेवेत
12
वैद्यकीय महाविद्यालयाचा कारभार कसा आहे, फीडबॅक द्या! राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाची मोहिम
13
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघडतंय सामान्यांचं बजेट
14
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
15
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
16
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
17
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
18
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
19
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
Daily Top 2Weekly Top 5

उद्योगाला झुकते माप देण्याचा प्रयत्न : सुभाष देसाई

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2018 01:18 IST

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : एमआयडीसीमध्ये पारदर्शक पद्धतीने प्लॉटचे वाटप केले आहे. ८० टक्यांपेक्षा जास्त भूखंड विकले गेले आहेत. छोट्या बैठकांमधून उद्योगांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. उद्योगाला झुकते माप देऊन महाराष्ट्र उद्योगात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि खाण मंत्री सुभाष देसाई यांनी केले.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), बुटीबोरी ...

ठळक मुद्देव्हीआयए, बीएमए, एमआयएतर्फे सत्कार

लोकमत  न्यूज नेटवर्कनागपूर : एमआयडीसीमध्ये पारदर्शक पद्धतीने प्लॉटचे वाटप केले आहे. ८० टक्यांपेक्षा जास्त भूखंड विकले गेले आहेत. छोट्या बैठकांमधून उद्योगांच्या हिताचे निर्णय घेतले जातात. उद्योगाला झुकते माप देऊन महाराष्ट्र उद्योगात पहिल्या क्रमांकावर आणण्याचा प्रयत्न असल्याचे प्रतिपादन राज्याचे उद्योग आणि खाण मंत्री सुभाष देसाई यांनी केले.विदर्भ इंडस्ट्रीज असोसिएशन (व्हीआयए), बुटीबोरी मॅन्युफॅक्चरिंग असोसिएशन (बीएमए) आणि एमआयए इंडस्ट्रीज असोसिएशनच्या (एमआयए) हिंगणाच्या वतीने बुधवारी उद्योग भवनातील व्हीआयएच्या सभागृहात सुभाष देसाई यांचा सत्कार करण्यात आला. सत्काराला उत्तर देताना ते बोलत होते. मंचावर एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सेठी, व्हीआयएचे अध्यक्ष अतुल पांडे, बीएमएचे अध्यक्ष नितीन लोणकर, एमआयएचे अध्यक्ष कॅ. सी.एम. रणधीर, व्हीआयएचे उपाध्यक्ष सुरेश राठी आणि सचिव डॉ. सुहास बुद्धे उपस्थित होते.देसाई म्हणाले, हिंगणा येथे विस्तारासाठी ४६ भूखंड वितरित केले असून १२ गाळेधारकांना प्लॉट देण्यात येणार आहे. बुटीबोरीत ईएसआयसी रुग्णालयासाठी ५ एकर जागा दिली आहे. बैठकीनुसार यापुढे ग्रामपंचायतींनी वसूल केलेल्या कराचा ५० टक्के वाटा एमआयडीसीला मिळेल. यावर ग्रामविकास मंत्र्यांशी चर्चा झाली असून लवकरच अंमलबजावणी होईल. प्लास्टिक बंदीचा निर्णय अप्रिय आहे, पण पर्यावरण विभागाला तो सक्तीने घ्यावा लागला. संबंधित वस्तूंवरील बंदी चर्चेतून सुटू शकते. प्लास्टिकच्या बाटल्या तरंगताना दिसल्या तर त्यावरही बंदी येईल.अमरावती येथील ५०० हेक्टरवरील टेक्सटाईल पार्क यशस्वी झाला आहे. आता या प्रकल्पात ११२४ हेक्टरपर्यंत वाढ केली आहे. काही बाबतीत महाराष्ट्राची पिछेहाट झाली आहे, पण झारखंडशी तुलना करू नका. शासनासोबत करार केलेल्या उद्योजकांना उद्योग सुरू करण्याचे बंधन नसल्याचे देसाई म्हणाले.पदाधिकाऱ्यांनी विचारलेल्या प्रश्नांना उत्तर देताना सेठी म्हणाले, राज्यात अनेक औद्योगिक क्षेत्रात सीईटीपी नाही. ज्या ठिकाणी आहे, तिथे अद्ययावत करण्यात येत आहे. एमआयडीसी वित्तीय पुरवठ्यासाठी तयार आहे. बोर्ड बैठकीत निर्णय घेऊ. असोसिएशननेही त्यात सहभाग नोंदवावा. सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट व सिव्हरेज ट्रीटमेंट प्रकल्पावर एमआयडीसी काम करीत आहे. आॅप्टिकल फायबर टाकण्यात असोसिएशनचा सहभाग असावा.संचालन सुहास बुद्धे यांनी केले. याप्रसंगी डिक्कीचे मध्य भारताचे अध्यक्ष निश्चय शेळके, बीएमएचे सचिव सीए मिलिंद कानडे, व्हीआयए महिला विंगच्या अध्यक्षा साची मलिक, व्हीआयएचे पदाधिकारी आणि विविध उद्योजक संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते.

टॅग्स :Subhash Desaiसुभाष देसाईnagpurनागपूर