शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
3
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाद यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
4
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
5
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
6
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
7
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
8
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
9
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
10
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
11
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
12
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
13
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
14
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
15
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
16
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
17
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
18
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
19
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
20
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
Daily Top 2Weekly Top 5

नागपुरात पिज्जा हट लुटण्याचा प्रयत्न

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 31, 2017 16:07 IST

आॅनलाईन लोकमतनागपूर : सोमवारी रात्री बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिज्जा हटच्या शाखेत शिरलेल्या दोन सशस्त्र लुटारूंनी रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्यामुळे आरोपी पळून गेले.लक्ष्मीनगरातील श्रद्धानंद पेठमध्ये पिज्जा हटची शाखा आहे. सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास आतमध्ये आवराआवर सुरू असताना शाखेसमोर एका मोपेडवर तीन जण आले. ...

ठळक मुद्देकर्मचाऱ्यांचे प्रसंगावधान सशस्त्र आरोपी हात हलवत पळाले

आॅनलाईन लोकमतनागपूर : सोमवारी रात्री बजाजनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील पिज्जा हटच्या शाखेत शिरलेल्या दोन सशस्त्र लुटारूंनी रक्कम लुटण्याचा प्रयत्न केला. मात्र, कर्मचाऱ्यांनी प्रसंगावधान राखत आरडाओरड केल्यामुळे आरोपी पळून गेले.लक्ष्मीनगरातील श्रद्धानंद पेठमध्ये पिज्जा हटची शाखा आहे. सोमवारी रात्री ११.३० च्या सुमारास आतमध्ये आवराआवर सुरू असताना शाखेसमोर एका मोपेडवर तीन जण आले. एक बाहेरच दुचाकी घेऊन थांबला. तर, चेहऱ्यावर स्कार्फ बांधलेले दोघे आतमध्ये शिरले. एकाच्या हातात चाकू तर दुसऱ्याच्या हातात बेस बॉलची स्टीक होती. त्याचा धाक दाखवत आरोपींनी आतमधील कर्मचाऱ्यांना गप्प केले. त्यानंतर रोख रकमेबाबत विचारणा करून लुटारूंनी एक ड्रॉवर उघडला. त्यात काहीच आढळले नाही. त्यामुळे लुटारूंनी रोख रकम शोधणे सुरू केले. त्यांचे मनसुबे ध्यानात आल्यामुळे आतमधील कर्मचाऱ्यांनी आरडाओरड केली. एकाने दुसऱ्या कर्मचाऱ्याला १०० क्रमांकावर फोन करण्याची सूचना केली. ते ऐकून लुटारू घाबरले आणि हात हलवत पळून गेले.दरम्यान, कर्मचाऱ्याने पोलीस नियंत्रण कक्षात (१००) फोन केल्यामुळे त्याची माहिती बजाजनगर पोलिसांना कळली. पोलिसांनी लगेच धाव घेतली. त्यानंतर व्यवस्थापक मिथून रमेश भिसे (वय २९) यांच्या तक्र ारीवरून पोलीस उपनिरीक्षक कुथे यांनी गुन्हा दाखल केला.सीसीटीव्हीत अंधारआरोपींचा छडा लावण्यासाठी पोलिसांनी सीसीटीव्ही तपासले. मात्र, आरोपींनी स्कार्फ बांधल्यामुळे त्यांची ओळख पटली नाही. तर बाहेर अंधार असल्यामुळे त्यात दुचाकीचा क्र मांकही व्यवस्थित दिसत नसल्याचे पोलीस सांगतात. आरोपी नवखे गुन्हेगार असावे, त्यामुळे अवघ्या दोनच मिनिटात त्यांनी तेथून पळ काढल्याचा अंदाज पोलिसांनी बांधला आहे. बाजुचे सीसीटीव्ही आणि दिसत असलेल्या दुचाकीच्या अर्धवट क्र मांकाच्या आधारे पोलीस आरोपीचा छडा लावण्याचा प्रयत्न करीत आहेत.

टॅग्स :crimeगुन्हे