शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेत्री काजोलला राज कपूर विशेष योगदान पुरस्कार प्रदान, म्हणाली, "आज माझा वाढदिवस..."
2
ढगफुटीत हॅलिपॅड वाहून गेला, हर्षिलमधील लष्कराच्या तळालाही फटका, अनेक जवान बेपत्ता...  
3
रोहित शर्मा, विराट कोहली २०२७च्या वनडे विश्वचषकाचा भाग नसणार? समोर आली मोठी अपडेट
4
Dharali floods: 43 किमी वेग... 1230 उंच डोंगरावरून आले पाणी अन् गाळ; कशी उद्ध्वस्त झाली धराली?
5
VVPAT शिवाय होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका, निवडणूक आयोगाने केलं स्पष्ट 
6
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
7
एअरटेलने जिओला मागे टाकले! पहिल्या तिमाहीत ५९४८ कोटींचा नफा; महसुलातही मोठी वाढ
8
VIDEO: साडी नेसून.. डोक्यावर पदर घेऊन... 'देसी भाभी'चा शकिराच्या 'हिप्स डोन्ट लाय' वर भन्नाट डान्स
9
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
10
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
11
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
12
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
13
Vivo Y400 5G: एमोलेड डिस्प्ले, ६००० mAh बॅटरी आणि बरेच काही; विवो व्हाय ४०० भारतात लॉन्च!
14
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
15
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
16
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
17
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
18
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
19
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
20
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...

ट्रूजेटच्या विमानाचे नागपुरात नाईट पार्किंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2019 12:03 IST

या महिन्याच्या सुरुवातीला नागपुरातून दोन शहरांसाठी उड्डाण सुरू करणाऱ्या एअरलाईन्स ट्रूजेटने आता मोठा बदल केला आहे. पहिल्यांदा अहमदाबाद आणि हैदराबादकरिता विमान सेवा सुरू करण्याची तयारी करणारी ट्रूजेट आता केवळ अहमदाबादकरिता संचालन करणार आहे.

ठळक मुद्देएमआयएल देणार सवलत नागपूर-अहमदाबाद विमान सेवा सुरू करणार

वसीम कुरैशी।लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : या महिन्याच्या सुरुवातीला नागपुरातून दोन शहरांसाठी उड्डाण सुरू करणाऱ्या एअरलाईन्स ट्रूजेटने आता मोठा बदल केला आहे. पहिल्यांदा अहमदाबाद आणि हैदराबादकरिता विमान सेवा सुरू करण्याची तयारी करणारी ट्रूजेट आता केवळ अहमदाबादकरिता संचालन करणार आहे. याशिवाय कंपनी विमानाचे नाईट पार्किंग नागपुरात करणार आहे. यासोबतच नागपूर विमानतळावर विमानाचे नाईट पार्किंग सुरू करणारी तिसरी विमान कंपनी ठरणार आहे.आतापर्यंत इंडिगो एअरलाईन्स आणि गो एअर कंपनीतर्फे विमानाचे नाईट पार्किंग करण्यात येत आहे. मिहान इंडिया लिमिटेडच्या (एमआयएल) सूत्रांनी सांगितले की, ट्रूजेटने नाईट पार्किंगकरिता एमआयएलकडून सवलत मागितली आहे. याकरिता एमआयएल तयार आहे. ट्रूजेटने पूर्वीही नागपुरातून संचालन केले आहे. एमआयएलच्या धोरणानुसार जुन्या आॅपरेटरला सूट देण्यात येत नाही, पण मार्ग नवीन असल्यामुळे एक महिन्यासाठी नाईट पार्किंग मोफत मिळेल.

प्रवाशांची अडचण नाहीप्राप्त माहितीनुसार ट्रूजेट पूर्वी विमान २टी १७९/१८० नागपूर-अहमदाबाद-नागपूर व्यतिरिक्त २टी १८५/१८६ नागपूर-हैदराबाद-नागपूर सेवा सुरू करणार आहे. पण विमानाची उपलब्धता नसल्यामुळे सध्या अहमदाबादकरिता उड्डाण सुरू करण्यात येणार आहे. शेड्यूल व सिस्टीमवर बुकिंग सुरू करण्यासाठी थोडा वेळ लागणार होता. पण आता १० जुलैपासून नागपूर ते अहमदाबाद थेट उड्डाण राहणार असल्याची माहिती आहे. सध्या नागपूर ते अहमदाबादकडे थेट उड्डाण नाही. नागपुरातून गुजरातमध्ये खरेदीसाठी जाणाऱ्यांची संख्या जास्त असल्यामुळे कंपनीला प्रवासी संख्येत काहीही अडचण येणार नाही.

एटीआर ७२ सीटचे विमानट्रूजेट या उड्डाणासाठी एटीआर ७२ सिटचे विमान चालविणार आहे. त्यामुळे प्रवासी संख्येसाठी कंपनीला समस्या येणार नाही. अहमदाबादकरिता थेट विमान सेवा देणाºया ट्रूजेटकरिता नागपुरात सध्या कुणीही स्पर्धक नाही. दुसरीकडे नाईट पार्किंग असल्यामुळे संबंधित मार्गावर कंपनीचे वर्चस्व राहील. ट्रूजेटचे नागपूर-अहमदाबाद विमानसायंकाळी ७ वाजता आणि परतीसाठी अहमदाबादमध्ये सायंकाळी ५ वाजता उपलब्ध राहील.

हिवाळ्यात वाढणार विमानसूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हैदराबादकरिता नागपुरातून पूर्वीच विमान सेवा उपलब्ध असल्यामुळे पावसाळ्यात या मार्गावर सध्या विमान सेवा सुरू करण्याचे कंपनीने टाळले आहे. कंपनीला हैदराबाद आणि नागपूर विमानतळावरून दोन्ही उड्डाणासाठी टाईम स्लॉट देण्यात आला आहे. कंपनीला नागपुरात कार्यालय सुरू करण्यास काहीही अडचण नाही. पूर्वीही नागपुरातून विमानसेवा सुरू केली आहे. कंपनीला कार्यालय सहजरीत्या उपलब्ध होऊ शकते.

टॅग्स :Dr. Babasaheb Ambedkar International Airportडॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळ नागपूर