शहरं
Join us  
Trending Stories
1
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
2
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
3
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
4
मी यापुढे निवडणूक लढवणार नाही, पण...; एकनाथ खडसेंची राजकारणातून निवृत्ती?
5
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
6
या आठवड्यात सोन्याचे भाव कमी होतील की वाढतील? वाचा सविस्तर
7
'मालकाकडं बघून बैल खरेदी केल्याचं एक तरी...' आर आर आबांच्या रोहितने थेट पीएम मोदींना डिवचलं
8
...मग तुझ्या पोराला निवडून का आणला नाही?; जितेंद्र आव्हाडांचा अजित पवारांवर हल्लाबोल
9
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'
10
पाकिस्तानला वर्ल्ड कपमध्ये अमेरिकाही हरवेल असं वाटतंय; PCB चा माजी अध्यक्ष संतापला
11
Exclusive: काँग्रेसचे शहजादे माओवाद्यांची भाषा बोलत आहेत; PM मोदींनी सांगितला NDA आणि इंडी आघाडीतला फरक
12
"ती स्वतःबद्दल इतकं बोलते की..."; विक्रमादित्य सिंह यांचा कंगना राणौतला खोचक टोला
13
ना तेंडुलकर, ना जयसूर्या! वसीम अक्रमने सांगितला ९० च्या दशकातील सर्वोत्तम फलंदाज
14
'NOTA चं बटण दाबा'; इंदूरमध्ये भाजपला धडा शिकवण्याचे काँग्रेसचे आवाहन!
15
अस्सी घाटावर पूजा, कालभैरवाचा आशीर्वाद...; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी PM मोदींचा वाराणसीत मेगा प्लॅन
16
"बाबा लवकर गेला हे एकार्थी चांगलं झालं, कारण...", वडिलांविषयी असं का म्हणाली सखी गोखले?
17
"ठाकरेंना १९९९ मध्येच मुख्यमंत्री व्हायचं होतं, राणेंना रोखण्याची..."; फडणवीसांचा गौप्यस्फोट
18
Ashok Gehlot : राहुल गांधी स्मृती इराणींच्या विरोधात निवडणूक का लढवत नाहीत?; अशोक गेहलोत म्हणतात...
19
"आम्ही या हंगामात...", पराभवानंतर Hardik Pandya भावूक, दिली प्रामाणिक कबुली
20
माधुरीचा साधेपणा! 'साजन'मधील ड्रेस परिधान करुन पोहोचली पुरस्कार सोहळ्याला; 33 वर्ष जुना video viral

ट्रिपल तलाक ट्रोल : लज्जास्पद टीका, महिलेची तक्रार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 06, 2019 11:58 PM

ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या मुस्लिम महिलांना ट्रोल करून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल लज्जास्पद टीका केल्याचे प्रकरण मानकापूर पोलीस ठाण्यात पोहचले आहे. पोलिसांनी सना ऊर्फ हिना कौसर खान नामक महिलेच्या तक्रारीवरून नजिर अल्तमश, गुलाम जिलानी, झैदी शोएब आणि मोहम्मद सोहेल या चौघांवर आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.

ठळक मुद्देनागपूरच्या मानकापुरात गुन्हा दाखल

लोकमत न्यूज नेटवर्कनागपूर : ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाल्याचा आनंदोत्सव साजरा करणाऱ्या मुस्लिम महिलांना ट्रोल करून सोशल मीडियावर त्यांच्याबद्दल लज्जास्पद टीका केल्याचे प्रकरण मानकापूर पोलीस ठाण्यात पोहचले आहे. पोलिसांनी सना ऊर्फ हिना कौसर खान नामक महिलेच्या तक्रारीवरून नजिर अल्तमश, गुलाम जिलानी, झैदी शोएब आणि मोहम्मद सोहेल या चौघांवर आयटी अ‍ॅक्टनुसार गुन्हा दाखल केला आहे.ट्रिपल तलाक विधेयक मंजूर झाल्याच्या आनंदात भाजपाच्या वतीने गेल्या आठवड्यात उपराजधानीत आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मुस्लिम महिलाही त्यात सहभागी झाल्या. बुरख्यातील या महिलांनी लाडू खाऊ घालत आनंद व्यक्त केला. ते फोटो सोशल मीडियावर सर्वत्र व्हायरल झाले. त्या फोटोवरून नजिर, गुलाम, झैदी आणि सोहेल यांनी सना ऊर्फ हिना खानबाबत आक्षेपार्ह विधान असलेला मजकूर सोशल मीडियावर अपलोड केला. त्यातील काही शब्द फारच घाणेरडे आहे. त्यामुळे सनाने मानकापूर पोलीस ठाण्यात सोमवारी रात्री तक्रार नोंदवली. पोलिसांनी तिच्या तक्रारीवरून उपरोक्त चौघांविरुद्ध माहिती व तंत्रज्ञान कायद्याच्या कलमानुसार गुन्हा दाखल केला. आज मंगळवारी रात्री पुन्हा काही महिला मानकापूर ठाण्यात पोहचल्या. त्यांनीही यासंबंधाने तक्रार नोंदविल्याची माहिती आहे.

 

टॅग्स :triple talaqतिहेरी तलाकnagpurनागपूर